VIDEO : पुतण्याच्या वाढदिवशी सलमानचा काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट

VIDEO : पुतण्याच्या वाढदिवशी सलमानचा काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट

स्टंट व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला सलमानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमातील गाणं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jun 19, 2019 | 6:11 PM

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात सलमान खानने भाऊ सोहेल खानच्या मुलाच्या वाढदिवशी अफलातून स्टंट केला. सोहेल खानचा मुलगा योहानसाठी खास सलमान आणि सोहेल यांनी एकत्रित येऊन हा स्टंट केला. या स्टंटचा व्हिडीओ सलमान खानने त्याच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

सोहेल खानचा मुलगा योहान याचा आठवा वाढदिवस होता. त्यासाठी रविवारी म्हणजे 16 जून रोजी खान कुटुंबीय एकत्र जमले होते. त्यावेळी सलमान खान, सोहेल खान यांनी पुतण्या आणि भाच्यांसोबत प्रचंड धमाल केली.

सलमानने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये योहान बीनबॅगवर बसलेला दिसतो. दुसऱ्या बाजून सोहेल खान बीनबॅगवर उडी मारतो, त्यावेळी योहान बीनबॅगवरुन उडतो आणि सलमान खान त्याला झेलतो.

सलमानने ट्विटरवर व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय की, “Happy bday Yohan… dad’s got ur back and I got ur front …. but don’t fly too high.”

विशेष म्हणजे, या व्हिडीओला सलमानने थोडं एडिट सुद्धा केले आहे. स्टंट व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला सलमानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमातील गाणं आहे. संपूर्ण व्हिडीओ स्लो मोशनमध्ये आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें