
Salman khan step Mother : बॉलिवूडच्या प्रतिष्ठित डान्सर आणि अभिनेत्री हेलन यांच्या आयुष्यातील हैराण करणारा अध्याय समोर आला आहे. सांगायचं झालं तर, तेव्हा बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा बोलबाला होता. त्याच वेळी हेलन यांच्या आयुष्यात अंडरवर्ल्डने महत्त्वाची भूमिका बजावली… मुंबईचे माजी आयुक्त राकेश मारिया यांच्या नवीन पुस्तका म्हटल्यानुसार, जेव्हा हेलन यांना पूर्व पतीने छळ करून घराबाहेर काढलं आणि त्यांची सर्व मालमत्ता हडप केली, तेव्हा अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याने हेलन यांची मदत केली, सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या म्हणण्यावर करीम लाला याने हेलन यांनी मदत केली होती. जाणून घ्या का होता तो किस्सा…
राकेश मारिया यांनी लिहिलेल्या पुस्तकात उघड केल्याप्रमाणे, ग्लॅमरस पडद्यामागील व्यक्तिरेखेमागील हेलेन या एक कमकुवत तरुणी होत्या ज्यांचे वयाने खूप मोठ्या असलेल्या अरोराशी संबंध होतं. एवढंच नाही तर, हेलन यांनी स्वतःच्या संपत्तीचे सर्व अधिकार देखील अरोरा याला दिल होते. 1958 मध्ये हेलन यांना पहिला ब्रेक मिळाली… तेव्हा त्या फक्त 19 वर्षांच्या होत्या. त्यांनी जवळपास 700 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं… त्यांच्या संपत्तीचं नियंत्रण देखील अरोरा यांच्याकडे होतं…
हेलन स्वतःचं काम करत होत्या आणि पैसे कमावत होत्या… त्यांचा पहिला नवरा अरोरा याच्या करियरमध्ये असंख्य अडचणी येत होत्या… अशात नवऱ्याने हेलन यांच्यासोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. अखेर सर्व गोष्टी इतक्या बिघडल्या की, हेलन यांना नवऱ्याने धक्के मारत घराबाहेर केलं… पुस्तकात असं म्हटलं आहे की, हताश झालेल्या हेलन यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि लेखक-अभिनेता सलीम खान यांची मदत घेतली, दोघेही इंडस्ट्रीमध्ये जवळचे मित्र होते.
अशात दिलीप कुमार यांनी लाला याच्यासोबत संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. पण संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा दिलीप यांनी एक पत्र लिहिलं आणि हेलन यांना लालापर्यंत पोहोचवण्यास सांगितलं… करीम लाला चित्रपटप्रेमी नव्हता… जेव्हा त्याला ती कोण आहे हे कळलं आणि त्याने ती चिठ्ठी पाहिली तेव्हा त्याने सहाय्यकाला हेलन यांना त्याची पत्नी फातिमाकडे घेऊन जाण्यास सांगितलं.
हेलन यांनी स्वतःसोबत घडलेले प्रसंग सांगितले. तेव्हा सर्वांना कळलं की, हेलन सत्य परिस्थिती सांगत आहेत… अखेर लाला याच्या बायकोने हेलन यांना सर्वकाही ठिक होईल असं वचन दिलं आणि काही तासांनंतर घरी परतण्यास सांगितलं… त्यानंतर घरी परतलेल्या हेलन यांना स्वतःचं घर मिळालं होतं… पुढे पुस्तकात असं लिहिलं आहे की, ‘करीम लाला याची दहशत इतकी होती की, अरोरा याने कधीच हेलन यांच्याकडे मागे वळून पाहिलं नाही… करीम लाला याने हिंसा न करता फक्त नावाच्या भीतीने हेलन यांना त्यांचे हक्क पुन्हा मिळवून दिले.’