AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जावरून राजपाल यादवची भर कार्यक्रमात खिल्ली उडवणाऱ्यांना सलमानचं सडेतोड उत्तर

चेक बाऊन्स प्रकरणावरून राजपाल यादवची खिल्ली उडवणाऱ्यांना आता सलमान खानने सडेतोड उत्तर दिलं आहे. राजपाल यादवच्या समर्थनार्थ सलमानने एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने काय म्हटलंय, ते सविस्तर वाचा..

कर्जावरून राजपाल यादवची भर कार्यक्रमात खिल्ली उडवणाऱ्यांना सलमानचं सडेतोड उत्तर
Rajpal Yadav and Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 08, 2026 | 10:00 AM
Share

नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेता राजपाल यादवची खिल्ली उडवण्यात आली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता सलमान खान राजपालच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. पुरस्कार सोहळ्यात डॉलरच्या वाढत्या दराबद्दल बोलत असताना कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे पत्रकार सौरभ द्विवेदी हे चेक बाऊन्स प्रकरणावरून राजपालची खिल्ली उडवतात. डॉलरचा दर वाढला किंवा कमी झाला तरी तुम्हाला कर्जाची रक्कम तेवढीत परत करावी लागेल, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला होता. त्यावर आता सलमान खानने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

काय म्हणाला सलमान?

राजपाल भाऊ.. तू गेल्या 30 वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करतोय आणि आम्ही सतत विविध चित्रपटांमध्ये तुला भूमिकेची ऑफर दिली आहे. कारण आम्हाला तुझं काम माहीत आहे आणि तुझी भूमिका चित्रपटाला खरा अर्थ देते. तुला भरपूर काम मिळत राहील आणि डॉलरच्या किंमतीत तू काम करत राहशील. हे सत्य आहे. लक्षात ठेव.. कधीकधी प्रवाहात काही गोष्टी तोंडातून निघून जातात. जर तुला त्यावर काही उत्तर द्यायचं असेल तर ते लक्षात ठेव आणि मनापासून काम करत राहा. डॉलरचा भाव वाढो किंवा कमी होवो, काय फरक पडतो? पैसे इथे भारतातच द्यायचे आहेत’, असं सलमानने म्हटलंय.

सलमानच्या या पोस्टला उत्तर देताना राजपाल यादवने लिहिलं, ‘सलमान भाऊ.. माझ्या 30 वर्षांच्या प्रवासाचं कौतुक केल्याबद्दल तुझं खूप खूप आभार. तू नेहमीच मला मोठ्या भावाप्रमाणे मार्ग दाखवला आहेस, लव्ह यू भाई!’ नंतर राजपालने त्याच्या सोशल मीडिया अकाऊटंवर एक व्हिडीओ पोस्ट करत जाकिर खान आणि सौरभ द्विवेदी यांना ट्रोल न करण्याचं चाहत्यांना आवाहन केलं. “हे दोघं माझ्या भावंडांसारखे आहेत, त्यामुळे त्यांना काही वाईट म्हटलात तर ते मला वाईट म्हटल्यासारखं असेल”, असं म्हणत राजपालने मनाचा मोठेपणा दाखवला.

नेमकं काय घडलं?

5 एप्रिल रोजी मुंबईत स्क्रीन अवॉर्ड्सचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पत्रकार सौरभ द्विवेदी आणि कॉमेडियन जाकिर खान यांनी पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालन केलं होतं. मंचावर आल्यानंतर सौरभ यांनी डॉलरचा चढ-उतार, तरुणाई या विषयांवर टिप्पणी करताना राजपाल यादवची खिल्ली उडवली. “डॉलरचा दर वाढो किंवा कमी होवो.. तुम्ही घेतलेली तेवढीच रक्कम तुम्हाला परत करावी लागेल”, असं सौरभ यांनी कर्जावरून राजपालची मस्करी केली. सौरभ यांचे हे शब्द ऐकल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेला राजपाल अचानक शांत झाला आणि मग काही क्षणांनी अस्वस्थपणे हसू लागला होता. जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा राजपालच्या अनेक चाहत्यांनी या गोष्टीला अपमानास्पद म्हटलं आणि सौरभवर टीका करण्यास सुरुवात केली. चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादवला तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं होतं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...