Salman Khan : आमचं अफेअर होतं, तिनं मला सोडलं अन्…करिश्मा कपूरबद्दल सलमान खानचं वक्तव्य
Salman Khan On Karisma Kapoor : सलमान खान आणि करिश्मा कपूर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. अशातच आता एका कार्यक्रमात सलमान खाननं करिश्माबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण ९’ सध्या चर्चेत आहे. सलमान खान आणि करिश्मा कपूर या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये दिसले. त्यांनी त्यांच्या मैत्रीबद्दल चर्चा केली आणि एकमेकांच्या कामाचं कौतुक केलं. सलमान करिश्मासोबत मजा-मस्ती करताना आणि त्यांच्या नात्याबद्दल विनोद करतानाही दिसला. करिश्मानं सांगितलं की, तिनं आणि सलमानने ११ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. ‘आम्ही सतत एकत्र काम करायचो. आम्ही दोन चित्रपट एकत्र शूट करायचो आणि मग एकत्र शोसुद्धा करायचो. आमच्या बॅगा नेहमी तयार असायच्या.’ असं करिश्मा म्हणाली.
त्यानंतर करण म्हणाला की, करिश्मानं त्याला सांगितलेलं की, जेव्हा इंडस्ट्रीतील दोन लोक एकत्र काम करतात आणि एकमेकांच्या जवळ असतात, तेव्हा लोकांना वाटतं की त्यांच्यात काहीतरी आहे. पण मी अभिमानाने सांगू शकते की, आमची मैत्री खूप घट्ट होती, त्यात कोणतंही प्रेम नव्हतं. यावर सलमान गंमतीनं म्हणतो की, ती खोटं बोलत आहे. आमचं अफेअर होतं. करिश्मा उत्तर देते, ‘तू काय बोलतोयस, तो नेहमी असंच करतो. तो काहीही बरळतोय. तू फक्त सगळ्यांना कंटेंट देत आहेस.’
करिश्माबद्दल काय म्हणाला सलमान खान?
पुढे सलमान म्हणाला, ‘आमचं अफेअर होतं. मग तिनं मला सोडलं आणि लग्न केलं. माझं हृदय तुटलं होतं.’ त्यावर करिश्मा उत्तर देते, ‘गप्प बस. तू नेहमी माझ्यासोबत असंच करतोस.’
करिश्मा म्हणाली, ‘जेव्हा ‘मैने प्यार किया’ प्रदर्शित झाला, तेव्हा मी सलमानच्या प्रेमात होते. मी १६ वर्षांची होते. मी सरोज खान यांच्याकडे डान्स शिकत होते. सलमान खान तिथं ‘बाघी’ चित्रपटाचं शूटिंग करत होता. एके दिवशी, मी निघताना सलमानने मला विचारलं, ‘तू डब्बू अंकलची मुलगी आहेस का? मी तुला बघत आलोय. तू खूप मेहनत करते आहेस. मग सलमानने मला एक चॉकलेट दिलं. तेव्हापासून आम्ही मित्र झालो. सलमानला चॉकलेट खूप आवडतं. तो नाश्त्यालाही चॉकलेट खायचा.’
करिश्मानं ‘दुल्हन हम ले जाएंगे’ चित्रपटातील एक प्रसंग सांगितला. त्यामध्ये करिश्मानं एका गाण्यासाठी छोटा ड्रेस घातला होता, पण सलमानला तो आवडला नाही. मग करिश्मा डेव्हिड धवनकडे गेली आणि तक्रार केली की, सलमान तिला तो ड्रेस घालू देत नाहीये. त्यावर सलमान म्हणाला की, तो ड्रेस खूपच छोटा होता. तो वर सरकत होता. त्यामुळे मला तिला तो नीट करायला सारखं सांगावं लागत होतं.
