सलमान खानला झाला पेपरफुटीचा फायदा, स्वतः वडील सलीम खान यांनी सांगितलं

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने नुकताच नीट परीक्षेच्या पेपरफुटीवर मोठे भाष्य केले. त्यानंतर आता सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने मोठी खळबळ उडाली. सलमान खान याच्याच वडिलांनी पेपरफुटीवर भाष्य केले.

सलमान खानला झाला पेपरफुटीचा फायदा, स्वतः वडील सलीम खान यांनी सांगितलं
Salman Khan
| Updated on: Jul 23, 2026 | 4:22 PM

नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात विद्यार्थ्यांकडून देशभरात आंदोलन केले जातंय. सलमान खान यानेही विद्यार्थ्यांना सपोर्ट केला. जवळपास कलाकार या आंदोलनाबाबत पोस्ट शेअर करत आहेत. पेपरफुटीच्या मुद्द्यात विद्यार्थ्यांची बाजू मांडणे आता सलमान खान याच्या मोठे अंगलट आले. सलमान खान याच्या वडिलांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान, सलीम खान, सोहेल खान आणि अरबाज खान हे कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहोचले आहेत. यावेळी सलमान खान कशाप्रकारे पेपरफुटीचे पेपर खरेदी करायचा हे सांगताना सलीम खान दिसत आहेत. सोशल मीडियावर जुना शाळेतील फोटो शेअर करत सलमान खान याने पेपरफुटीचा मुद्दा गंभीर असल्याचे म्हणत पोस्ट शेअर केली . त्यानंतरच त्याचा कपिल शर्मा याच्या शोमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सलमान खान स्वत: पेपरफुटीचे पेपर घेऊन पास व्हायचा आणि हा पेपरफुटीचा मुद्द्या गंभीर असल्याचे म्हणत आहे, असे म्हणत लोक त्याच्यावर संताप व्यक्त करत आहेत. सलमान खान याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सलीम खान हे काही गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहेत. सलीम खान हे सलमान खान याच्या शाळेतील दिवसाचा किस्सा सांगताना दिसत आहेत.

सलीम खान म्हणतात की, माझे मुले प्रश्नपत्रिका फुटल्याचा फायदा घेऊन पास झाली आहेत. मी त्यावेळी खूप जास्त व्यस्त असायचो. आमच्या घरी गणेश नावाचा व्यक्ती येत. तो घरी आला की, त्याला प्रचंड मान दिला जायचा. माझ्यापेक्षाही त्याचा सन्मान अधिक होत. मी विचार केला हा गणेश नक्की कोण आहे, ज्याला इतका सन्मान दिला जातोय.

त्यानंतर मी या गणेशची माहिती काढायचे ठरवले. मग मला समजले की, हीच ती व्यक्ती आहे जी माझ्या मुलांना परीक्षेचे फुटलेल्या प्रश्नपत्रिका मिळवून देतो आणि त्याकरिता मदत करतो. सलमानने हे देखील मान्य केले की, त्याने त्या फुटलेल्या प्रश्नपत्रिकांच्या मदतीने काही परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या. आता हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Follow Us