Salman Khan : वयाच्या 60 व्या वर्षी सलमान खानला बाबा व्हायचंय? ‘कॉफी विथ करण’मध्ये म्हणाला – मुलांची उणीव ..
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने पिता बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 9' या शोमध्ये तो या विषयावर बोलला आहे, मुलांची कमतरता जाणवते, असं तो म्हणाला.

Salman Khan Koffee With Karan Season 9: बॉलीवूड सुपरस्टार आणि चाहत्यामध्ये भाईजान नावाने प्रसिद्ध असलेल्या सलमान खानने (Salman Khan)आत्तापर्यंत लग्न केलेलं नाही. त्याला अनेकदा मुलाखतींमध्ये हा प्रश्न विचारला जातो की तो लग्न कधी करणार? मात्र आता खुद्द सलमाननेच त्याच्या पर्सनल लाइफबद्दल भाष्य केलं आहे. भविष्यात पिता बनण्याची इच्छा आहे, असं सलमान नुकतचं म्हणाला. 60 व्या वर्षी मुलांची कमतरता जाणवते. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 9’ या चॅट शोमध्ये बोलताना, त्याने या विषयावरही मत मांडलं.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘कॉफी विद करण 9’ या लोकप्रिय चॅट शोमध्ये सलमान आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसणार आहे. ‘व्हरायटी इंडिया’च्या वृत्तानुसार, या शोमधील संवादादरम्यान सलमानने वडील होण्याची इच्छा व्यक्त केली. आयुष्यात कधीतरी आपल्याला मूल हवं असल्याचं त्याने सांगितलं.
करण जोहरने सलमानला नेमकं काय विचारलं?
सलमान खानचं आपल्या भाच्यांवर आणि पुतण्यांवर खूप प्रेम आहे. त्यांच्यासोबत सलमानचं खास नातं असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. याच मुद्द्यावरून करण जोहरने सलमानला एक प्रश्न विचारला. ‘ज्या व्यक्तीला आपल्या भावंडांच्या मुलांसोबत वेळ घालवायला आवडतं, त्या व्यक्तीला स्वतःचं मूल नसल्याची उणीव कधी जाणवते का?’असं करणने सलमानला विचारलं. या प्रश्नाचं उत्तर देताना सलमानने होकार दिला आणि आपल्यालाही मूल हवं असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सलमानने आणखी काय सांगितलं, हे संपूर्ण एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतरच समोर येईल.
कुठे पाहता येईल सलमानचा ‘कॉफी विथ करण’ चा एपिसोड?
सलमान खानचा ‘कॉफी विद करण 9’मधील एपिसोड 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. या शोचा हा शेवटचा सीझन असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये सलमान खान पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे.
जिओ हॉटस्टारने या एपिसोडचा एक प्रोमोही शेअर केला. यामध्ये सलमान आणि करण जोहर यांच्यात रंगलेला मजेशीर संवाद पाहायला मिळतो. प्रोमोमध्ये सलमान करणला मिश्किलपणे विचारतो की, शेवटचा सीझन असल्याचं सांगून तो सगळ्यांसोबत ‘कॉफी विद करण’ करत आहे की काय? यावर करण हा शो पुन्हा सुरू करणार नसल्याचं वचन देतो. करणचं उत्तर ऐकल्यानंतर सलमान हसत म्हणतो, “करण, तुस्सी न जाओ…” सलमानच्या या विनोदी प्रतिक्रियेमुळे प्रोमोची रंगत आणखी वाढली आहे. आता या शोमध्ये सलमान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणखी काय खुलासे करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.