Samantha: मी आणि राजने तडजोड केली होती की आमचं बाळ..; प्रेग्नंसीवर समंथा स्पष्टच बोलली

Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लवकरच आई होणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये तिने राज निदिमोरुशी लग्न केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या प्रेग्नंसीच्या निर्णयाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

Samantha: मी आणि राजने तडजोड केली होती की आमचं बाळ..; प्रेग्नंसीवर समंथा स्पष्टच बोलली
समंथा, राज निदिमोरू
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 11, 2026 | 8:45 AM

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका नव्या आणि खास टप्प्याचा आनंद घेत आहे. समंथा आणि तिचा पती, दिग्दर्शक राज निदिमोरू लवकरच पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. विशेष म्हणजे, समंथासाठी ही प्रेग्नन्सी पूर्णपणे अनपेक्षित होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने स्वतः याबाबत खुलासा करताना सांगितलं की, मूल होणं हा दोघांसाठीही आधीपासून ठरवलेला निर्णय नव्हता. समंथाने सांगितलं की, ती आणि राज यांचं आयुष्यात मूल असावं किंवा नसावं, या दोन्ही शक्यतांबाबत एकमत होतं. त्यामुळे प्रेग्नन्सीची बातमी समोर आली तेव्हा त्यांच्यासाठी हा एक सुखद धक्का होता. आता मात्र दोघंही त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या या मोठ्या बदलासाठी उत्सुक आहेत.

समंथाला ती आई होणार असल्याची माहिती तिच्या ‘थसदिया’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मिळाली होती. त्यानंतर जून 2026 मध्ये तिने प्रेग्नन्सीची बातमी सार्वजनिकपणे जाहीर केली. ‘मा इन्टी बंगारम’ या चित्रपटाच्या यशाच्या कार्यक्रमात तिचा बेबी बंप दिसल्यानंतर तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. समंथासाठी हा टप्पा विशेष महत्त्वाचा आहे. मागील काही वर्षांमध्ये तिने वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. आरोग्याशी संबंधित अडचणींमुळे तिला अभिनयापासून काही काळ ब्रेकही घ्यावा लागला होता. त्यानंतर तिने पुन्हा कामाकडे वळत स्वतःची कारकीर्द नव्याने उभी केली.

समंथा सध्या काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल साधण्याच्या तयारीत आहे. आई होण्याच्या या नव्या भूमिकेसाठी ती उत्सुक असून, तिच्या आगामी आयुष्याबद्दल सकारात्मक असल्याचं दिसत आहे. तिच्या प्रेग्नन्सीची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. समंथा आणि राज निदिमोरू यांच्या आयुष्यातील हा नवा अध्याय त्यांच्या चाहत्यांसाठीही तितकाच खास ठरत आहे. अनपेक्षितपणे आलेल्या या आनंदाला दोघेही मनापासून स्वीकारत असल्याचं समंथाच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं.

समंथा आणि राज या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. समंथाने अभिनेता नाग चैतन्यशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर समंथा ‘मायोसिटिस’ या ऑटो इम्यून आजाराचा सामना करत होती. या कठीण काळात तिला राजची साथ मिळाली. अखेर दोघांनी या नात्याचं विवाहबंधनात रुपांतर केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us