AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेग्नंसीबाबत अखेर समंथाकडून खुलासा; म्हणाली “आता मला थोडा ब्रेक..”

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लग्नाच्या सहा महिन्यांनंतर गरोदर असून लवकरच ती आई होणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये तिने निर्माता राज निदिमोरूशी लग्न केलं होतं. आता लवकरच हे दोघं आई-बाबा होणार आहेत.

प्रेग्नंसीबाबत अखेर समंथाकडून खुलासा; म्हणाली आता मला थोडा ब्रेक..
Samantha Ruth Prabhu and Raj NidimoruImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 25, 2026 | 9:15 AM
Share

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने अखेर तिच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची चर्चा होती. अखेर आता तिनेच त्यावर मौन सोडत चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. 39 वर्षीय समंथा लवकरच आई होणार आहे आणि पुढील काही दिवसांत मॅटर्निटी ब्रेक घेणार असल्याचंही तिने जाहीर केलं आहे. ‘मा इंटी बंगारम’ या चित्रपटाच्या यशानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात समंथा माध्यमांशी बोलताना म्हणाली, “या चित्रपटानंतर आता मला थोडा ब्रेक घ्यावा लागेल, कारण माझी आताची स्थितीच तशी आहे. मला मॅटर्निटी लिव्ह घ्यावी लागेल. त्यानंतर मी माझ्या चाहत्यांसाठी नव्या चित्रपटासोबत परत येईन.”

समंथाच्या या वक्तव्यामुळे तिच्या प्रेग्नंसीबद्दलच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. याआधी याच चित्रपटाच्या सक्सेस पार्टीदरम्यान समंथाचा बेबी बंप दिसला होता. तेव्हापासूनच तिच्या गरोदरपणाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, समंथा सध्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, म्हणजेच पहिल्या तिमाहित आहे. ती आणि तिचा पती राज निदिमोरू हे या आनंदाच्या बातमीने खूपच खुश आहेत. समंथासुद्धा तिच्या आयुष्यातील या नव्या टप्प्याबद्दल अत्यंत उत्साहीत आहे. समंथाला नेहमीच आई होण्याची इच्छा होती आणि हा क्षण तिच्यासाठी खूप खास आहे. समंथाची प्रसूती डिसेंबर 2026 मध्ये अपेक्षित आहे.

समंथाचा व्हिडीओ-

‘मा इंटी बंगारम’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका नंदिनी रेड्डी यांनीही समंथाच्या गरोदरपणाबद्दल आनंद व्यक्त केला. “आमच्या चित्रपटाला मोठं यश मिळत असतानाच समंथाच्या आयुष्यात ही आनंदाची बातमी आली आहे”, असं त्या म्हणाल्या. समंथाने डिसेंबर 2025 मध्ये कोईंबतूर इथल्या ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात निर्माता राज निदिमोरूशी लग्न केलं. ‘द फॅमिली मॅन 2’ या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान या दोघांची भेट झाली होती.

समंथा आणि राज या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. समंथाने अभिनेता नाग चैतन्यशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर समंथा ‘मायोसिटिस’ या ऑटो इम्यून आजाराचा सामना करत होती. या कठीण काळात तिला राजची साथ मिळाली. अखेर दोघांनी या नात्याचं विवाहबंधनात रुपांतर केलं.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला