AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या 6 महिन्यांनी समंथा गरोदर; 39 व्या वर्षी अभिनेत्री होणार आई

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लग्नाच्या सहा महिन्यांनंतर गरोदर असून तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. समंथाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज निदिमोरूशी लग्न केलं होतं.

लग्नाच्या 6 महिन्यांनी समंथा गरोदर; 39 व्या वर्षी अभिनेत्री होणार आई
समंथा रुथ प्रभू, राज निदिमोरूImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 21, 2026 | 8:08 AM
Share

अभिनेता नाग चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने डिसेंबर 2025 मध्ये ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजचा दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं. कोइंबतूर इथल्या ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. आता लग्नाच्या सहा महिन्यांनंतर समंथाने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. 39 वर्षीय समंथा लवकरच आई होणार असून नुकत्याच एका कार्यक्रमात तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळाला. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. समंथाचा नुकताच ‘मा इंटी बंगारम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच चित्रपटाचा यश साजरा करण्यासाठी समंथाने तिच्या टीम आणि पती राजसोबत केक कापला. याच सेलिब्रेशनच्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये समंथा गरोदर असल्याचं पहायला मिळालं.

समंथाच्या ‘मा इंटी बंगारम’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हाच आनंद साजरा करण्यासाठी या चित्रपटाची संपूर्ण टीम एकत्र जमली होती. यावेळी समंथा आणि राज यांनी एकत्र केक कापला. या सेलिब्रेशनच्या व्हिडीओमध्ये समंथा अगदी साध्या लूकमध्ये दिसली. तिने फिकट निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केला होता. या बॉडी-फिट टी-शर्टमध्ये समंथाचा बेबी बंप सहज पहायला मिळाला. हे पाहताच नेटकऱ्यांनी समंथा आणि राजवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. ‘ती प्रेग्नंट आहे, अभिनंदन सॅम’, असं एकाने लिहिलं. तर ‘होय, बेबी बंप स्पष्ट पहायला मिळतंय’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

समंथाचा व्हिडीओ

प्रेग्नंसीबाबत अद्याप समंथा किंवा राजने कोणतीच अधिकृत माहिती दिली नाही. मात्र ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, समंथा खरोखरंच गरोदर आहे. हे दोघंही त्यांच्या या नवीन सुरुवातीबद्दल खूप आनंदी आहेत. लवकरच समंथा आणि राज मिळून ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगतील.

समंथा आणि राज यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी कोइंबतूरमधल्या ईशा योग सेंटरमधील लिंग भैरवी मंदिरात लग्न केलं. या लग्नाला फक्त जवळचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते. समंथा आणि राज यांनी ‘द फॅमिली मॅन 2’ आणि ‘सिटाडेट: हनी बनी’ या वेब सीरिजसाठी एकत्र काम केलं होतं. राजने याआधी सहाय्यक दिग्दर्शिका श्यामली डे हिच्याशी लग्न केलं होतं. श्यामलीने राकेश ओमप्रकाश मेहरा आणि विशाल भारद्वाज यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केलंय. तर समंथाने याआधी नाग चैतन्यशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. समंथा घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं.

Follow Us
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले...
Sanjay Raut on Eknath Shinde | पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले!; राऊतांचा शिंदेंना टोला
मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं
Mumbai Local | मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं; बाकीचे प्रवासी फक्त बघतच राहिले
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं? शिवसेनेच्या 7 फुटीर खासदारांना नेमक्या काय दिल्या सूचना?
शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? ठाकरेंचा सरकारवर घणाघात
Raj Thackeray | शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? राज ठाकरेंनी...
Raj Thackeray | प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? NEET पेपरफुटीपासून परदेशी शिक्षणापर्यंत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना...
Nagpur | नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना काळाचा घाला