Spain Train Accident : मोठी बातमी! दोन हायस्पीड ट्रेनची एकमेकांना जोरदार धडक, भीषण अपघातात 50 प्रवाशांचा मृत्यू
वेगात येणाऱ्या दोन रेल्वे एकमेकांवर धडकल्या आहेत. या दुर्घनटेत तब्बल 39 जणांचा जागीच मृत्यू झाला असून शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.

Spain Railway Accident : रेल्वेचा प्रवास हा सर्वाधिक सुरक्षित मानला जातो. म्हणूनच फक्त भारतच नव्हे तर जगभरातील देशांमध्ये रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. परंतु याच रेल्वेचे कधीकधी भीषण अपघात होतात. हे अपघात एवढे भीषण असतात की यामध्ये एका क्षणात अनेकांचा मृत्यू होतो. सध्या रेल्वे अपघाताची अशीच एक भयानक घटना घडली आहे. वेगात येणाऱ्या दोन रेल्वे एकमेकांवर धडकल्या आहेत. या दुर्घनटेत तब्बल 50 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 200 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.
घटना नेमकी काय घडली?
स्पेन देशात ही घटना घडली आहे. अतिशय वेगाने धावणाऱ्या दोन रेल्वे एकमेकांना धडकल्या आहेत. या ट्रेन वेगात असल्याने ही दुर्घटना घडली आहे. स्पेनची राजधानी माद्रिदच्या दक्षिण भागातील आंदालुसिया या प्रदेशातील रेल्वे लाईनवर ही दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कमी तकमी 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्यात याच रेल्वे लाईनवर रेल्वे अपघाताची मोठी दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत तब्बल 46 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हा दुसरा रेल्वे अपघात समोर आलेला आहे.
SPAIN TRAIN CRASH: 46 DEAD, 179 INJURED
At least 46 people have been killed and 179 injured after Iryo and Renfe trains collided near Toledo, Spain.
While emergency services report 46 deaths, local sources claim the actual toll could be much higher.
— Subodh Kumar (@kumarsubodh_) October 28, 2026
दोन डबे रुळावरून घसरले अन्…
रेल्वे ऑपरेटर कंपनी एडीफने सोशल मीडियावर या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. माद्रिद आणि आंदालुसिया या दरम्यानच्या हायस्पीड ट्रेनचा प्रवास आता रोखण्यात आला आहे. रेल्वे अपघाताची ही दुर्घटना बुधवारी सकाळी 9 वाजता घडली. या दुर्घटनेत रेनफे आणि इरिया या कंपनीच्या दोन ट्रेन एकमेकांवर धडकल्या. टक्कर झाल्यानंतर इरिया कंपनीच्या रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले.
घटना कशी घडली, चौकशी सुरू
दरम्यान ही घटना समोर येताच बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे ही घटना नेमकी का घडली? याची तपासणी केली जाणार आहे.
