Karma hits back : अभिनेत्री समंथा प्रभू जुन्या ट्विट वरुन ट्रोल

समंथा प्रभू तिच्या एका जुन्या पोस्टवरुन ट्रोल झाली आहे. तिचा सिनेमा १ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Karma hits back : अभिनेत्री समंथा प्रभू जुन्या ट्विट वरुन ट्रोल
| Updated on: Sep 03, 2023 | 8:27 PM

मुंबई : अभिनेत्री समंथा प्रभू हिने आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. 2013 मध्ये तिने एका अप्रकाशित तेलगू चित्रपटाच्या प्रतिगामी पोस्टरबद्दल ट्विट केले होते. कुशी सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पण त्याआधी ती चांगलीच ट्रोल झाली होती. हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कुशी ही शिव निर्वाण दिग्दर्शित एक लव्ह कॉमेडी सिनेमा आहे.

12 जुलै रोजी, कुशी चित्रपटाच्या निर्मात्यांनी आराध्या नावाच्या चित्रपटातील एक प्रेम गीत रिलीज केले होते. त्यानंतर 2013 मधील सामंथाचे जुने ट्विट पुन्हा समोर आले. गाणे रिलीज झाल्यानंतर काही तासांनंतर मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले होते.

महेश बाबूच्या काही चाहत्यांना वाटले की सामंथाची गूढ पोस्ट ही अभिनेत्याच्या नेनोक्कडाईन चित्रपटाबद्दल होती. पण आता तिचा सिनेमा रिलीज झालाय. 1 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये कुशी प्रदर्शित झालाय. लोकांनी तिच्या जुन्या ट्विट वरुन तिला ट्रोल करत कर्मा हिट्स बॅक असे म्हटले आहे.

अभिनेत्री समंथा ही मायोसिटिसचा उपचार घेत होती. यासाठी ती अमेरिकेला ही जाणार असल्याचं बोललं जात आहे.