Samantha Ruth Prabhu : नवव्या महिन्यातही समंथाचं जिममध्ये जोरदार वर्कआऊट, नेटकरी म्हणतात, कोणत्याही क्षणी…
समंथा रूथ प्रभू लवकरच आई होणार आहे. सध्या तिचा 9 वा महिना चालू आहे. पण अशातच ती जीममध्ये कसून व्यायाम करताना दिसली आहे. तिला मुलगा होणार असे बोलले जात आहे. वाचा सविस्तर

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू लवकरच आई होणार आहे. सातव्या महिन्यातील तिच्या पारंपरिक डोहाळे जेवणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. पण आता तिचा नववा महिना चालू आहे, डिलिव्हरी केव्हाही होऊ शकते. अशावेळी ती जिममध्ये कसून व्यायाम करताना दिसते आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती हातात डंबेल घेऊन स्व्कॅट्स मारताना दिसत आहेत. ज्यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहे.
या व्हिडिओमध्ये तिने प्रेंग्नेसीच्या पहिल्या दिवासापासून ते शेवटच्या दिवसांपर्यंतचा फिटनेस प्रवास करून दाखवला आहे. पहिल्या महिन्यात ती ज्या पद्धतीने व्यायाम करत होती, त्याच प्रकारचा व्यायाम नवव्या महिन्यातही करताना दिसते. हातात डंबेल धरून ती वेटेड स्व्कॅट्स करत आहे.या व्हिडिओला तिने #9 The Final Lap असं कॅप्शनही दिलं आहे. म्हणजेच आता शेवटचा महिना सुरू आहे, असा त्या कॅप्शनचा अर्थ आहे.
समंथाने याआधीही प्रेग्नेंसी दरम्यानच्या व्यायामाचे काही व्हिडिओ शेअर केले होते. मात्र या काळात तिच्या व्यायामाची पद्धत बदलल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे. ‘आता व्यायाम करताना जास्त मेहनत करण्यापेक्षा शरीर काय सांगतंय, हे ऐकण्याला महत्त्व देते, ‘असं तिने एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. काही दिवस ती जास्त व्यायाम करते तर काही दिवस शरीराला आराम देते.
समंथाच्या या व्हिडिओवर अभिनेत्री कृती खरंबदानेही कमेंट केली आहे. ‘तुम्हा तिघानाही खूप प्रेम’अशा शब्दांत तिने समंथा आणि तिच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत. तर चाहत्यांनी सुपरमॉम म्हणत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोशल मिडिया यूजर्सनी तिला काळजी घेण्यासाठीही सांगितली आहे, तर काहींनी बेबी बंप बघून समंथाला मुलगा होणार असा अंदाज बांधला आहे. समंथाने 30 ऑक्टोबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.