AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहा मुलींच्या आईने 8 महिन्यांचं बाळ चक्क 1.80 लाखांना विकत घेतलं, पण सख्ख्या बापानेच पोटच्या गोळ्याचा सौदा का केला? हादरवणारी कहाणी!

काळजात धस्स करणारी एक घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमध्ये एका लहान बाळाचा चक्क सौदाच करण्यात आला आहे. हा सौदा करणारा दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द त्या बाळाचा बाप आहे. पण हे सगळं त्याने केलं तरी का आणि केलेल्या कृत्याचा त्याला का पश्चाताप झाला? घटनेबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

सहा मुलींच्या आईने 8 महिन्यांचं बाळ चक्क 1.80 लाखांना विकत घेतलं, पण सख्ख्या बापानेच पोटच्या गोळ्याचा सौदा का केला? हादरवणारी कहाणी!
Bijnor baby selling caseImage Credit source: social media
| Updated on: Oct 30, 2026 | 9:32 PM
Share

घटना उत्तर प्रदेशातील बिजनोरमधील मंडावली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. याठिकाणी राहणारा आराम सिंह हा मोल मजुरी करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत होता. त्याला त्याच्या परिवाराचा खर्चाचा व्याप चांगल्याप्रकारे चालवण्यासाठी काहीतरी करायचे होते. त्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा घेण्याची त्याची इच्छा होती. त्यासाठी पैसे नसल्याने तो विवंचनेत होता. त्याची ही इच्छा त्याने काही लोकांना बोलूनही दाखवली होती. याच दरम्यान, त्याची भेट शेजारील गावातील समशेर आणि खूशनूद यांच्याशी झाली. त्याने त्यांना आपली सर्व परिस्थिती आणि इलेक्ट्रिक रिक्षा खरेदी करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.

यावेळी या दोघांनी आराम सिंहला त्याची अडचण दूर करण्याऐवजी असा सल्ला दिला की, त्यामुळे पुढे एक खळबळजनक प्रकार घडला. असा आरोप करण्यात आला आहे की, या दोघांनी आराम सिंहसला सांगितलं की तू जर तुझं ८ महिन्यांच लहान बाळ विकायला तयार असशील तर तुला पैसे मिळू शकतील. त्यातून तुला रिक्षाही घेता येईल. त्यातून तुझं घर-कुटुंब तू चांगल्याप्रकारे चालवू शकतो. त्यानंतर कथित प्रकारासाठी आराम सिंह तयार झाला.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढे समशेर आणि खूशनूद या दलालांनी खुशहालपूरमधील देवराज सिंह आणि त्याची पत्नी सुनीताशी संपर्क साधून ८ महिन्यांच्या मुलाचा चक्क सौदा करुन टाकला. हा सौदा १ लाख ८० हजारांमध्ये करण्यात आला. या व्यवहारानंतर पैशांच्या बदल्यात मुलाचे हस्तांतरण करण्यात आले. पण काही काळाने मुलाशिवाय आराम सिंहला बैचेन व्हायला झाले. त्याच्या कुटुंबीयांनीही त्यच्या या निर्णयाचा विरोध केला. बाळाला परत आणण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला. त्यानंतर आराम सिंहने यासर्व प्रकरणाबाबत पोलिसांशी संपर्क साधून आपलं बाळ परत मिळावं अशी विनंती केली. आपल्याला पैशांचं आमिष दाखवून हे सर्व करण्यासाठी मजबूर करण्यात आल्याचा दावा त्याने पोलिस स्टेशनला केला.

त्यानंतर तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप करत ८ महिन्यांचा मुलाला सुनीताकडून आरामच्या परिवाराकडे सूपूर्द केलं. याप्रकरणी कथित सौद्यामुळे देवराज आणि त्याच्या पत्नीसह दोन दलालांवर आणि आराम सिंहवरही कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात सुनीताने सांगितलं की, आपल्याला सहा मुली आहेत. पण मुलगा नव्हता. या कारणाने आपण दलालांच्या सहाय्याने बाळाचा सौदा केला. या प्रकरणाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. . पुढील तपास पोलिस करत आहेत.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान