
अभिनेत्री सना खानने फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला असला तरी ती कायमच चर्चेत असते. तिने नुकताच एका पॉडकास्टमध्ये तिच्या आयुष्यातील जुन्या दिवसांबाबत भाष्य केले आहे. सनाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आता ती नेमकं काय म्हणाली चला जाणून घेऊया...

सना शेखने अभिनेत्री रुबिना दिलैकच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. रुबिनाशी संवाद साधत असताना तिला अश्रू अनावर झाले आहेत.

सना खान म्हणाली की, 'स्त्री म्हणून सैतानाने मला कधी विवस्त्र केले ते मला कळलेही नाही. मी बॅकलेस आणि शॉर्ट स्कर्ट्समध्ये अचानक दिसू लागले. ते मलाही कळलं नाही. त्यावेळी मला रडू कोसळले होते.'

पुढे ती म्हणाली, 'मी स्वतःला विचारू लागले की मी आनंदी का नाही? फुल स्लीव्ह्जवरून बॅकलेसमध्ये कधी गेले ते मलाही कळले नाही. मी एक पारंपारिक ड्रेसमध्ये कॉलेजमध्ये जाणारी मुलगी होते आणि मी बॅकलेस कपड्यांमध्ये स्टेजवर पोहचू लागले होते.'

सनाने या पॉडकास्टमध्ये सांगितले की तिने धर्मासाठी या सगळ्या गोष्टींचा त्याग केला. तिला तिचे जुने दिवस आठवून लाज वाटते. कारणी ती फक्त पैसे कमावायच्या मागे होती. तिला आतून आनंद मिळत नव्हता. तेव्हा तिच्या मनात विचार आला की, ती जे करत आहे ते इस्लाममध्ये हराम आहे. त्यांच्या धर्मानुसार हे अजिबात योग्य नाही. म्हणून तिने धर्म बदलला.