
सलमान खानचा प्रसिद्ध शो बिग बॉस सीजन 19 प्रेक्षकांच्या भेटीला 24 ऑगस्ट 2025 पासून येतंय. बिग बॉस म्हटले की, जवळपास सर्वच प्रेक्षकांचा जवळचा विषय ठरतो. सलमान खान मागील अनेक वर्षांपासून या शोला होस्ट करतोय. सलमान खानचे चाहतेही या शोसोबत जोडले गेली आहेत. बिग बॉसच्या घरात अभिनेते आणि अभिनेत्री कायमच धमाका करताना दिसतात. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून बिग बॉसचे चाहते शोची वाट पाहत आहेत. शोच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांच्या नजरा आहेत. हे सीजन धमाकेदार करण्यासाठी सर्व प्रयत्न निर्मात्यांकडून केली जात आहेत.
अखेर बिग बॉस 19 च्या घरात कोण येणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मागचे सीजन खास ठरले. अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री या शोमध्ये पोहोचले होते. भारताचे माजी क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. युनायटेड किंग्डमहून हार्मोन ट्रान्सप्लांट करून अनाया परतलीये. अनाया पूर्वी आर्यन बांगर होती. अगोदर अनाया मुलगा होती आणि आता ती मुलगी झालीये.
सध्या अनाया चर्चेचा विषय ठरलीये. तिने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, मी ज्यावेळी आर्यनमधून अनाया झाले, त्यावेळी मला भारताच्या अनेक क्रिकेटरने त्यांच्यासोबत संबंधांसाठी ऑफर केली. हेच नाही तर त्यांनी मला त्यांचे कपडे न घातलेले फोटोही पाठवली. कारमध्ये चल बोलायचे. मुलानंतर मुलगी झाल्यानंतर आपल्यासोबत काय काय घडले हे सांगताना अनाया दिसली आणि तिने काही खळबळजनक आरोपही केली. आता हीच अनाया बांगर बिग बॉसच्या घरात सहभागी होणार असल्याचे सांगितले जाते.
अनाया बिग बॉसच्या घरात येऊन का धमाका करते, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. अनाया बांगर हिला बिग बॉस सीजन 19 ची ऑफर आलीये. अनाया बांगर बिग बॉसच्या घरात येणार असल्याचे सांगितले जातंय. आता बिग बॉसच्या घरात येऊन अनाया बांगर ही काय काय खुलासे करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अनाया ही एक क्रिकेटर आहे. अनाया ही बिग बॉसच्या घरातील सर्वात चर्चेत स्पर्धेक ठरणार हे स्पष्ट आहे.