
Sanjay Dutt 1993 Mumbai Blast Case: अभिनेता संजय दत्त याला 1993 मध्ये बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्यामुळे अटक करण्यात आली. त्याच वर्षी मुंबईत ब्लास्ट देखील झालेला आणि प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी IPS अधिकारी राकेश मारिया यांच्यावर होती. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राकेश मारिया यांनी तेव्हा नक्की काय घडलेलं याबद्दल सांगितलं आहे. संजय दत्त याला विमानतळावर पाहिल्यानंतर राकेश मारिया यांनी संजूबाबाच्या सणसणीत कानाखाली मारली… याबद्दल राकेश मारिया यांनी सविस्तर सांगितलं आहे.
राकेश मारिया यांनी 1993 मध्ये मुंबईत झालेल्या ब्लॉस्टबद्दल मोठा खुलासा केला आहे… तेव्हा संजय दत्त मॉरिशस येथे सिनेमाची शुटिंग करत होता. भारतात परतल्यानंतर त्याला विमातळावरुव थेट पोलीस स्थानकात आणण्यात आलं… जेथे संजय दत्त याची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा संजूबाबाच्या अडचणीत मोठी वाढ झालेली होती…
राकेश मारिया म्हणाले, ‘संजय दत्त याने पहिल्यांदा सांगितलं की, मी कोणताच गुन्हा केलेला नाही… तेव्हा त्याचे केस लांब होते.. मी त्याच्या सणसणीत कानाखाली मारली… त्याने केस ओढून त्याला वर खेचलं… त्यानंतर मला त्याने सर्वकाही सांगितलं… सुनिल दत्त यांना काहीही सांगू नका असं देखील त्याने मला सांगितलं… यावर मी त्याला म्हणालो, ‘तुझ्या वडिलांना मी सांगणार नाही असं होईल का?”
राकेश मारिया पुढे म्हणाले, ‘संजय दत्त याला एका खोलीत नेण्यात येतं… जिथे त्याचे वडील (सुनिल दत्त) असतात… तो एका लहान मुलाप्रमाणे ओरडू लागतो आणि जावून वडिलांच्या पायाखाली पडतो आणि म्हणतो, ‘बाबा चुकी झाली…’ पण याप्रकरणी संजय याचं नाव कसं समोर आलं? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल…
यावर राकेश म्हणाले, वांद्र येथील लोकप्रिय रेस्टॉरंटचे मालक हनीफ कडावाला आणि इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPA) चे तत्कालीन अध्यक्ष समीर हिंगोरा यांच्या मदतीमुळे संजूबाबाचं नाव समोर आलं.. राकेश म्हणाले, ‘हनीफ आणि समीर मला म्हणाले तुम्ही मोठ्या लोकांना का अटक करत नाही? यावर मी दोघांना म्हणालो, कोणत्या मोठ्या लोकांना मी अटक केली नाही? तेव्हा त्यांनी मला सांगितलं संजय दत्त… मला देखील कळलं नाही, यामध्ये संजय दत्तंचा काय संबंध असेल…’
हनीफ आणि समीर यांनी राकेश यांनी दिलेल्यामाहितीनुसार, कारमधून शस्त्रे काढण्यासाठी हल्लोखोरांना एक जागा हवी होती आणि यासाठी संजय दत्त याच्या घराचा सल्ला देण्यात आलेला… त्याच शस्त्रांचा वापर 1993 मध्ये हल्ला करण्यासाठी करण्यात आलेला… असं देखील राकेश मारिया यांनी सांगितलं… संजय दत्तला बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याबद्दल तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्याने त्याची शिक्षा भोगली आणि 2016 मध्ये त्याची सुटका झाली. त्यानंतर तो सिनेमांमध्ये पुन्हा सक्रिय झाला.