संजू'बाबा' मराठीत, सिनेमाचं पोस्टर लॉन्च

संजय दत्तने 'बाबा' सिनेमाचं पोस्टर ट्विटरवरुन लॉन्च करताना, अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात कॅप्शन लिहिले आहे.

संजू'बाबा' मराठीत, सिनेमाचं पोस्टर लॉन्च

मुंबई : मराठी सिनेमांची वाढती लोकप्रियता आणि विविध विषयांवरील सिनेमांची निर्मिती पाहता, बॉलिवूडलाही मराठी सिनेमांची भुरळ पडल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसते आहे. अजय देवगण, प्रियांका चोप्रा, सलमान खान यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी आतापर्यंत मराठीत सिनेमे केले आहेत. यांच्याच पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडचा ‘बाबा’ अर्थात अभिनेता संजय दत्तही मराठीत पदार्पण करत आहे. संजय दत्तच्या होम प्रॉडक्शनचा पहिला मराठी सिनेमा मराठीत येत आहे. ‘बाबा’ असे सिनेमाचे नाव असून, आज या सिनेमाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले. स्वत: संजय दत्तने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन सिनेमाचं पोस्टर लॉन्च केले.

मनिष सिंग यांनी लिहिलेल्या ‘बाबा’ सिनेमाचं, राज गुप्ता यांनी दिग्दर्शन केले आहे. अभिनेता अभिजीत खांडकेकर, अभिनेत्री नंदिता धुरी, अभिनेत्री स्पृहा जोशी अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट ‘बाबा’मध्य दिसणार आहेत. संजय दत्तच्या ‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’ आणि ब्ल्यू मस्टँग या दोन संस्थांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

येत्या 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘बाबा’ सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता संजय दत्त मराठी सिनेसृष्टीत निर्मात्याच्या रुपात पाऊल टाकत आहे. संजय दत्त असो वा दिवंगत सुनिल दत्त किंवा नर्गीस असो, या सर्वांचेच मराठी आणि महाराष्ट्राची जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. सुनील दत्त आणि मुलगी प्रिया दत्त हे तर मुंबईतून खासदार होते.

संजय दत्तने ‘बाबा’ सिनेमाचं पोस्टर ट्विटरवरुन लॉन्च करताना, अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात कॅप्शन लिहिले आहे. ‘बाबा’चे पोस्टर शेअर करताना संजय दत्तने वडील सुनील दत्त यांच्या आठवणींना उजाळा दिला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *