
अभिनेता संजय दत्त याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांचं मनोरजंन केलं. पण अभिनेता त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकताच अभिनेत्याने त्याच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. जिथे अभिनेत्याने आयुष्यातील अनेक मनोरंजक गुपिते उलगडली आणि तुरुंगात घालवलेल्या दिवसांची आठवण देखील ताज्या केल्या. अभिनेत्याने सांगितलं की, तो तुरुंगात कोणती कामं करायचा. ज्यासाठी त्याला पगार मिळयचा…
संजय दत्त याचा मित्र आणि अभिनेता सुनील शेट्टी याच्यासोबत विनोदवीर कपील शर्मा याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये पोहोचला होता. यावेळी अभिनेत्याने तुरुंगातील काही दिवसांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. संजय दत्त तुरुंगात काम करायचा, ज्यासाठी त्याला पैसे देखील मिळत होते.
संजय दत्त तुरुंगात स्वतःचा रेडिओ शो चालवायचा. याशिवाय, अभिनेत्याने एक नाटक कंपनी देखील स्थापन केली आहे. याशिवाय, संजयने तुरुंगात खुर्च्या आणि कागदी पिशव्या बनवून पैसेही कमवले.
संजूबाबा म्हणाला, ‘मी तुरुंगात एक नाटक कंगनी देखील सुरु केली होती. मी नाटक कंपनाचा दिग्दर्शक होतो.. हत्या करणारी लोकं माझ्यासोबत काम करत होती… मी नाटकांसाठी कथा देखील कैद्यांकडून लिहून घेत होतो…’, सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फॉट प्रकरणात संजय दत्त याचं नाव समोर आलं होतं. शस्त्रास्त्र कायद्याशी संबंधित एका प्रकरणात अभिनेत्याला अनेक वेळा तुरुंगात जावं लागलं. तो पाच वर्षे तुरुंगात होता. हे अभिनेत्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होते.
संजय दत्त याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘बागी 4’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई करताना दिसत आहे. वयाच्या 66 व्या वर्षी देखील अभिनेता मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे.
अभिनेता खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. दोन लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्याने तिसरं लग्न मान्यता दत्त हिच्यासोबत केलं. आता अभिनेता तिसऱ्या पत्नीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. संजय आणि मान्यता जुळ्या मुलांसोबत आयुष्य जगत आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.