
Sanjay Dutt first Wife Richa Sharma: बॉलिवूड अभिनेत्री संजय दत्त त्याच्या सिनेमांमुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. संजूबाबाने अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं. खासगी आयुष्यात संजूबाबाला अनेक संकटांचा सामना कराला लागला, ज्याचा परिणाम अभिनेत्याच्या प्रोफेशनल आयुष्यावर देखील झाला. संजूबाबावर दुःखाचा डोंगर कोसळला जेव्हा त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिचा वयाच्या 32 व्या वर्षी मृत्यू झाला. पहिल्या पत्नीच्यान निधनानंतर संजूबाबा पूर्णपणे कोलमडला होता. नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्याची बहीण प्रिया दत्त हिने ऋचाच्या निधनाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
प्रिया दत्त म्हणाल्या, ‘ऋचाच्या निधनानंतर संजय पूर्णपणे एकटा पडला होता. तो प्रचंड दुःखी होता. फार कमी वयात ऋचा हिला ब्रेन ट्यूमरचं निदान झालं होतं. ऋचाचं निधन संजयसाठी फार मोठा फटका होता. पण त्याने स्वतःला सावरलं. जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या समस्या पाहत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या समस्या फार मोठ्या वाटतात… देवाच्या कृपाने संजयने सर्व संकटांवर मात केली. आम्ही सर्वांत चांगले आणि वाईट क्षण देखील अनुभवले आहेत. संजय दत्त कायम वाईट परिस्थितींवर स्वतःच्या अंदाजात मात करतो.’ असं देखील प्रिया दत्त म्हणाल्या.
संजय दत्त याच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, संजय आणि ऋचा यांनी 1987 मध्ये अमेरिकेत लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी लेक त्रिशाला हिचं देखील जगात स्वागत केलं. पण लग्नाच्या 2 वर्षांनंतर ऋचा हिला ब्रेन ट्यूमरचं निदान झालं आणि न्यूयॉर्कमध्ये तिचं निधन झालं.
पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर संजूबाबाने दुसरं लग्न रिया पिल्लाई (rhea pillai) हिच्यासोबत केलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजयने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत रियाला प्रपोज केलं आणि 1998 मध्ये लग्न केलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही.
दोन लग्न अपयशी ठरल्यानंतर संजूबाबाने तिसरं लग्न मान्यता हिच्यासोबत केलं. 2008 मध्ये मान्यता आणि संजय दत्त यांनी लग्न केलं. लग्नानंतर मान्यता हिने जुळ्या मुलांना देखील जन्म दिला. संजूबाबाच्या मुलाचं नाव शाहरान आणि मुलीचं नाव इकरा असं आहे.