
उद्योगपती आणि सोना कॉमस्टार कंपनीचे अध्यक्ष तथा करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांचे गुरुवारी 13 जून 2025 इंग्लंडमध्ये निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. वृत्तानुसार, ते पोलो खेळत असताना त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ते ताबडतोब मैदानाबाहेर गेले, परंतु काही वेळाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की सामन्यादरम्यान संजय कपूरच्या तोंडात एक मधमाशी शिरली, ज्यामुळे घशात सूज आली आणि नंतर हृदयविकाराचा झटका आला.
संजय कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार मुंबई नाही तर याशहरात
संजय कपूर यांचे अंत्यसंस्काराबद्दलची माहिती त्यांचे सासरे आणि त्यांची सध्याची पत्नी प्रिया सचदेव यांचे वडील अशोक सचदेव यांनी दिली आहे. संजय कपूर यांचे अंत्यसंस्कार हे मुंबईत होणार नसून दिल्लीत होणार आहे. ते म्हणाले की, “सध्या पोस्टमॉर्टम प्रक्रिया सुरू आहे. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण होताच, संजय यांचे पार्थिव भारतात आणले जाईल आणि येथेच त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील.”
परदेशातून मृतदेह आणण्याची प्रक्रिया किती गुंतागुंतीची?
कोणत्याही परदेशातून मृतदेह भारतात आणण्यासाठी अनेक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पार पाडाव्या लागतात, जसे की:
स्थानिक पोलिस आणि वैद्यकीय अहवाल (मृत्यूची पुष्टी)
पोस्टमॉर्टेम रिपोर्ट (आवश्यक असल्यास)
मृत्यू प्रमाणपत्र
दूतावासाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी)
शवागारातून सोडण्याचा आदेश
शवसंलेपन (मृतदेह जतन करण्याची प्रक्रिया)
एअरलाइनकडून परवानगी आणि बुकिंग
या सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 3 ते 5 दिवस लागतात. जर मृत्यूचे कारण तपासाधीन असेल, तर ही प्रक्रिया आणखी लांबू शकते.
त्यामुळे आता संजय कपूर यांचे पार्थीव नक्की कधी भारतात आणले जाईल आणि या सर्व प्रक्रियेला नक्की किती वेळ लागेल याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान या दुःखद बातमीने करिश्मा कपूर खूप तुटली आहे. तर कुटुंब या बातमीने दुःखी आहे. त्याच वेळी, संजय कपूर यांची तीन दिवसांपूर्वी केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. संजय कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असायचे. ते अनेकदा इंस्टाग्रामवर पोस्ट करून आपले विचार व्यक्त करायचे. त्यांच्या मृत्यूच्या तीन दिवस आधी, 9 जून रोजी सकाळी 11.40 वाजता त्यांनी एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते – ‘पृथ्वीवरील तुमचा वेळ मर्यादित आहे.’