सवत करिश्मा कपूरबद्दल असं काय म्हणाली संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेव? चर्चांना उधाण

Priya Sachdev On Karisma Kapoor: संजय कपूरच्या निधनाबद्दल मोठी गोष्ट समोर..., सवत करिश्मा कपूर हिच्याबद्दल संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेव हिचं मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण...

सवत करिश्मा कपूरबद्दल असं काय म्हणाली संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेव? चर्चांना उधाण
फाईल फोटो
| Updated on: Jun 24, 2025 | 12:01 PM

Priya Sachdev On Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती संजय कपूर यांचे 19 जून रोजी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 22 जून रोजी शोकसभा ठेवण्यात आली. शोकसभेत संजय याची तिसरी पत्नी प्रिया सचदेवा वाईट अवस्थेत दिसली. तीन लहान मुलांची जबाबदारी सोडून संजय कपूर याने अखेरचा श्वास घेतला. सध्या संजय कपूर याच्या तिसऱ्या पत्नीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वडिलांच्या निधनानंतर आणि करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर संजय याची कशी अवस्था होती… याबद्दल प्रिया सचदेवा हिने सांगितलं आहे.

प्रिया सचदेवा   म्हणाली, संजय माझ्यासोबत कायम त्याच्या व्यवसायाबद्दल बोलायचा. माझ्याकडून सल्ले घ्यायचा. मी संजयची मदत करू लागली आणि संजयसोबत गुंतवणुकीचे अनेक निर्णय घेतले.’ प्रियाने पतीच्या प्रवासाबद्दल आणि वडील सुरिंदर कपूर यांच्या निधनानंतर कुटुंबाचा व्यवसाय कसा सांभाळायचा याचा दबाव होता याबद्दल सांगितलं होतं.

 

 

प्रिया म्हणाली, ‘एक वडील म्हणून संजयचा प्रवास फार चांगला होता. पण वडिलांच्या निधनानंतर संजय याला एकट्याला संपूर्ण व्यवसाय सांभाळावा लागला. त्याच दरम्यान संजय याचा घटस्फोट देखील झाला. संजयने आयुष्यात खूप काही सहन केलं आहे.’

 

 

‘आम्ही दोघांनी एकत्र अनेक संकटांचा सामना केला. पण आता सर्व वाईट गोष्टींवर मात केली आहे आणि संजय प्रसिद्ध उद्योजक आहे. संजय प्रचंड प्रेमळ आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. पण अनेकांना संजयला वाईट समजलं. पण आता संजयला इंडस्ट्रींमध्ये सन्मान मिळत आहे. जी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.’ असं देखील प्रिया म्हणाली होती.

संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचं लग्न

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे लग्न 2003 मध्ये झालं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी 2016 मध्ये घटस्फोट झाल्याची अधिकृत घोषणा केली. साखरपुडा मोडल्यामुळे करिश्मा हिने आईच्या इच्छेनुसार संजय याच्यासोबत लग्न केलं. संजय – करिश्मा यांना दोन मुलं देखील आहे. आता अभिनेत्री सिंगल मदर म्हणून मुलगी आणि मुलाचा सांभाळ करत आहे.