सारा अली खान एक्स बॉयफ्रेंडच्या धक्कादायक निधनानंतर म्हणालेली, ‘तो कधीच निष्ठावंत नव्हता, मला सतत…’

Sara Ali Khan: 'तो कधीच निष्ठावंत नव्हता, मला सतत...', एक्स बॉयफ्रेंडच्या धक्कादायक निधनानंतर सारा अली खान हिने केलेला मोठा खुलासा... कधी समोर आलेलं 'ते' रहस्य? कोण होता सारा अली खान हिचा एक्स बॉयफ्रेंड?

सारा अली खान एक्स बॉयफ्रेंडच्या धक्कादायक निधनानंतर म्हणालेली, तो कधीच निष्ठावंत नव्हता, मला सतत...
Sara Ali Khan
| Updated on: Feb 11, 2026 | 10:42 AM

Sara Ali Khan: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची लेक सारा अली खान हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘केदारनाथ’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सारा हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आता सारा फक्त सैफ आणि अमृता यांची मुलगी नाही तर, प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री देखील आहे. सारा फक्त तिच्या प्रोफेशनल नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. एक काळ असा देखील होता जेव्हा सारा तिच्या दिवंगत बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली होती .

‘केदारनाथ’ सिनेमानंतर सारा आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत अनेकदा एकत्र दिसले. पण दोघांनी देखील कधीच त्यांच्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली नाही. अखेर सुशांत यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. त्यानंतर सारा हिला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

Loading...

चौकशी दरम्यान सारा अली खान हिने सुशांत याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला होता. चौकशीत सारा हिने सुशांतसोबत अफेअर असल्याची कबुली दिलेली. ‘सुशांत कधीच नात्यामध्ये निष्ठावंत नव्हता.. तो खूप पझेसिव्ह होता. मी ज्या सिनेमात आहे, त्या सिनेमात त्याला (सुशांत) देखील कास्ट करा… असं जाऊन दिग्दर्शकांना सांग… असं तो कायम म्हणायता..’

ड्रग्ससेवनाबद्दल देखील सारा हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सिनेमाच्या शुटिंग दरम्यान मी सिगरेट ओढली आहे…’ अशी कबुली देखील साराने चौकशी दरम्यान दिली. एवढंच नाहीतर, सुशांत याच्या केअरटेकर याने देखील मोठी माहिती दिली होती.

लोणावळा याठिकाणी सुशांत सिंह राजपूत याचा एक फार्महाऊस आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर फार्महाऊसच्या केअरटेकरने IANS ला महत्त्वाची माहिती दिली होती. केअरटेकरने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता 2019 मध्ये सारा हिला प्रपोज देखील करणार होता. त्यासाठी सुशांत अभिनेत्रीला एक गिफ्ट देखील देणार होता.

सुशांत सिंह राजपूत याचं निधन

14 जुलै 2020 रोजी सुशांत याने मुंबई येथील वांद्रे याठिकाणी असलेल्या राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली. अभिनेत्याने छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची ओळख भक्कम केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us