Sara Ali Khan: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच साराने कार्तिकसाठी लिहिली पोस्ट; ‘तुझी सर्व स्वप्नं..’

सारा अली खानची कार्तिकसाठी खास पोस्ट; ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच झाली व्यक्त

Sara Ali Khan: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच साराने कार्तिकसाठी लिहिली पोस्ट; तुझी सर्व स्वप्नं..
Kartik Aryan and Sara Ali Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 23, 2022 | 10:04 AM

मुंबई: अभिनेत्री सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या अफेअर्समुळे सतत चर्चेत राहिली आहे. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये जेव्हा तिने पहिल्यांदा हजेरी लावली होती, तेव्हा बिनधास्तपणे तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यानंतरच दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांना डेट करू लागले. दुर्दैवाने कार्तिक आणि साराचं हे नातं फार काळ टिकलं नाही. ब्रेकअपनंतर आता पहिल्यांदाच साराने कार्तिकसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

कार्तिकने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अशातच त्याची एक्स गर्लफ्रेंड सारानेसुद्धा खास पोस्ट लिहित त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

काय आहे साराची पोस्ट?

कार्तिकच्या वाढदिवसाचा फोटो इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट करत साराने लिहिलं, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा कार्तिक आर्यन. तू ज्या गोष्टींची अपेक्षा केली होतीस, त्या गोष्टी तुला या वर्षात मिळो. तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होत राहो.’ साराच्या या पोस्टवर अद्याप कार्तिकने कोणतंच उत्तर दिलेलं नाही.

2020 मध्ये या दोघांनी ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, पण ही जोडी मात्र चाहत्यांमध्ये हिट ठरली. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते, असंही म्हटलं जातं.

ब्रेकअपनंतर बऱ्याच महिन्यांनी मुंबईत एका कार्यक्रमात या दोघांची समोरासमोर भेट झाली. पिंकविला स्टाइल आयकॉन इव्हेंटच्या रेड कार्पेटवर योगायोगाने कार्तिक आणि सारा एकाच वेळी पोहोचले होते. यावेळी पापाराझींनी त्यांना फोटोसाठी एकत्र पोझ द्यायला सांगितलं, तेव्हा दोघांची ‘Awkward’ मूमेंट स्पष्टपणे दिसून आली होती.