‘कालजयी सावरकर’मध्ये सौरभ गोखले साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका

वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे गेली अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रातील एक प्रथितयश नाव म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा गोपी कुकडे यांनी लघुपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या निमित्ताने ते प्रेक्षकांसमोर काहीतरी अनोखं घेऊन येण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.

‘कालजयी सावरकरमध्ये सौरभ गोखले साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका
Kaljayi Savarkar short film
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jun 07, 2022 | 7:30 AM

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Swatantryaveer Savarkar) आयुष्याचा आणि त्यांच्या क्रांतिकारक विचारांचा प्रवास उलगडून सांगणाऱ्या कालजयी सावरकर (Kaljayi Savarkar) या लघुपटाची नुकतीच घोषणा झाली. आता या लघुपटात आणखी कोणते कलाकार असतील आणि ते कोणत्या भूमिका साकारतील याविषयीचा खुलासाही झाला आहे. हिंदुस्थान एक राष्ट्र म्हणून आणि निवेदक या नात्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांची गोष्ट लघुपटातून सांगणार आहे. यामध्ये जेष्ठ हिंदुस्थानची निवेदक म्हणून भूमिका अभिनेते मनोज जोशी तर नव्या तरुण भारताची भूमिका अभिनेता तेजस बर्वे साकारत आहे. लघुपट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर आधारित असल्याने यामध्ये सावरकरांची भूमिका कोण करणार याविषयी विशेष उत्सुकता होती. आता त्यावरूनही पडदा उठला आहे. अभिनेता सौरभ गोखले (Saurabh Gokhale) हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री पायल गोगटे, अपर्णा चोथे, लिना दातार, ऋता पिंगळे तसेच अभिनेते हृदयनाथ राणे, शंतनू अंबाडेकर, जयोस्तु मेस्त्री, दिनेश कानडे, चिन्मय पाटसकर, हृषीकेश भोसले, पवन वैद्य आणि प्रमोद पवार यांच्या सहयोगी भूमिका आहेत. लवकरच या लघुपटाचे प्रदर्शन सामान्य प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात याचे विशेष प्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

नव्या तरुण भारताच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे

या लघुपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचे विविध पैलू आणि अंतरंग उलगडून दाखवण्यात येणार आहेत. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे गेली अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रातील एक प्रथितयश नाव म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा गोपी कुकडे यांनी लघुपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या निमित्ताने ते प्रेक्षकांसमोर काहीतरी अनोखं घेऊन येण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.