A.R. Rehman : शांत रहा आणि..; ए. आर. रेहमान यांच्या वक्तव्यावर वहिदा रेहमान म्हणाल्या..

प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांनी अलीकडेच सांप्रदायिक भेदभावाबद्दल केलेल्या विधानामुळे ते बराच चर्चेत आला होता, त्यावर लोकांच्या अजूनही प्रतिक्रिया देत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनीही या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. यापूर्वीही अनेकांनी रहमान याच्या विधानावर प्रतिक्रिया दिल्या, काहींनी त्याला सपोर्ट केला, तर काही जण त्याच्याविरोधात बोलले होते.

A.R. Rehman : शांत रहा आणि..; ए. आर. रेहमान यांच्या वक्तव्यावर वहिदा रेहमान म्हणाल्या..
ए.आर.रहमान यांच्या वक्तव्यावर वहिदा रेहमान यांची प्रतिक्रिया काय ?
| Updated on: Jan 27, 2026 | 9:42 AM

आपल्या सुमधुर संगीताने लोकांच्या हृदयात स्थान पटकावणारे, ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान ( A. R. Rahman) सध्या त्यांच्या कामामुळे नव्हे तर त्यांच्या विवादास्पद विधानांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गेल्या 8 वर्षांत आपल्याला बॉलिवूडमध्ये खूप कमी काम मिळाल्याचा खुलासा केला होता. फिल्म इंडस्ट्री सांप्रदायिक होत चालली असून त्यामुळे काम मिळालं नसल्याचंही ते म्हणाले होते. मात्र त्यांच्या या विधानावर बरीच टीका झाली. त्यांच्याच क्षेत्रातील लोकांसह जनसामान्यांनीही रहमान यांच्या या विधानाचा निषेध करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. जावेद अख्तर, राम गोपाल वर्मा, भजनसम्राट अनुप जलोटा तसेच अभिनेता रणवीर शौरी यांसारख्या अनेकांनी रहमानच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. याच मुद्यावर आता ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमानही बोलल्या आहेत.

ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी अलिकडेच मुलाखतीत केलेल्या एका विधानामुळे बराच वाद झाला. जातीय भेदभावामुळे इंडस्ट्रीत त्यांना काम मिळत नसल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं होतं. तसंच छावा चित्रपटाबद्दलही त्यांनी भाष्य केलं होतं. बघता बघता हा मुद्दा चांगलाच पेटला, आणि त्यावरून सुरू झालेला वाद अद्यापही शांत व्हायची काही चिन्ह दिसत नाहीयेत. आता याच मुद्यावर अभिनेत्री वहिदा रहमान या देखील बोलल्या आहेत.

काय म्हणाल्या वहिदा रेहमान ?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी एआर रहमानच्या विधानावर भाष्य केलं. ” कोणावर विश्वास ठेवायचा, किती विश्वास ठेवायचा ? ही गोष्टी खरी आहे की नाही, या सगळ्या वादात आपण का पडलं पाहिजे ? वयाच्या या टप्प्यावर येऊन मी या सर्वात (वादांत) पडू इच्छित नाही. पण मला एक गोष्ट नक्की सांगायची आहे ती म्हणजे शांतपणे रहायला शिका. हा देश आपला आहे, शांत रहा आणि फक्त आनंदी रहा” अशा शब्दांत या संपूर्ण वादावर त्यांनी आपलं मत मांडलं.

इंडस्ट्रीतील कामाबद्दल सोडलं मौन

पुढे त्या म्हणाल्या, ” वेळ कधी एकसारखी रहात नाही. कधी खूप काम मिळतं, तर कधीच काहीच हातात नसतं. हे सगळं तर चालतच असतं. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. एका ठराविक वयानंतर लोकं म्हणतात की, कोणत्यातरी वेगळ्या किंवा नव्या व्यक्तीला (कामासाठी) आणा. त्यामुळे काही लोकं मागेच राहतात तर काहीजण पुढे निघून जातात. काही लोकं असेही असतात जे सतत काम करत राहतात, नेहमी उंचीवर असतात, पण असं सदैव तर राहणार नाही ना” असंही वहिदा रहमान यांनी नमूद केलं.

काही दिवसांपूर्वी ए. आर. रेहमान यांना ‘बीबीसी एशियन नेटवर्क’च्या मुलाखतीत इंडस्ट्रीतील पक्षपातीपणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वैयक्तिकरित्या भेदभावाचा सामना केला नाही असं म्हटलं. पण अशा गोष्टींना इंडस्ट्रीतील बदलणारे पॉवर स्ट्रक्चर्स हे योगदान देणारे घटक ठरू शकत असल्याचं मत मांडलं होतं. आता जे लोक क्रिएटिवह नाहीत, त्यांच्याकडे ही पॉवरक आहे. मला गेल्या 8 वर्षांपासून काम मिळत नाहीये. हे. कदाचित ही एक सांप्रदायिक गोष्टदेखील असेल पण ती माझ्यासमोर दिसली नाही असं ए. आर. रहमान म्हणाले होते.