घरात नोकराला दफन केलं… कबरीवर धणे पिकवले आणि… मन विचलिच करणारा 17 मिनिटांचा सिनेमा

ओटीटी प्लॅटफॉर्म अनेक असे सिनेमे जे तुम्हाला कदाचित माहिती देखील नसतील... अशाच सिनेमांपैकी एक असा देखील सिनेमा आहे. ज्यामध्ये घरात नोकराला दफन करण्यात येत आणि त्याच्या कबरीवर धणे पिकवले जातात... कशी आहे स्टोरी घ्या जाणून...

घरात नोकराला दफन केलं... कबरीवर धणे पिकवले आणि... मन विचलिच करणारा 17 मिनिटांचा सिनेमा
| Updated on: Jan 11, 2026 | 2:35 PM

सध्या ओटीटीचा काळ आहे… अनेक जण सिनेमागृहात सिनेमा पाहण्यापेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहण्यासाठी पसंती दर्शवतात… ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे काही सिनेमे आहेत, जे अधिक रंजक आणि थ्रिलर असतात… सांगायचं झालं तर, अनेक सिनेमांच्या कथा या सत्य घटनांवर आधारित असतात. असे सिनेमे पाहिल्यानंतर मन तर विचलित होतच, पण सतत डोक्यात त्या सिनेमाबद्दल विचार सुरु राहतात… ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे सिनेमे आणि सीरिजची भरभराट आहे. आता 9 वर्षांच्या थ्रिलर ड्रामा सिनेमाबद्दल बोलूया ज्याची कथा एखाद्या हॉरर सिनेमापेक्षा कमी नाही. सिनेमाची कथा नोकराच्या हत्येच्या भोवती फिरताना दिसत आहे. सिनेमा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे.

आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, सिनेमाचं नाव काय आहे आणि सिनेमात कोणा महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री टिस्का चोप्रा, रसिका दुग्गल, आदिल हुसैन आणि सुमित गुलाटी स्टारर शॉर्ट फिल्म ‘चटनी’ सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे. फक्त 17 मिनिटांच्या या सिनेमात प्रेक्षकांचं मन विचलिच होईल.

सिनेमाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाची कथा एका गृहिणी आणि एका चुलबुल्या महिले भोवती फिरत आहे, ज्या दिसायला सामान्य आहेत, पण त्यांचे दैनंदिन जीवनही तितकेच अशांत आहे. पाहता पाहता सिनेमा एका भयानक टप्प्यावर जाऊन पोहोचतो. ही कथा फसवणूक, कट आणि विश्वास बसणार नाही अशा सत्याची आहे. सिनेमाचं नाव चटनी आहे, पण सिनेमाची कथा गोड आणि आंबट तर आहेच पण मसालेदार देखील आहे.

नोकराची हत्या…

एका नोकराच्या हत्येने सिनेमाची कथा आणखी गुंतागुंतीची होते. जेव्हा दोन मैत्रिंणीमध्ये नोकराचं नाव घेतलं जातं तेव्हा कथेला वेगळे वळण मिळते. एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला तिच्या पतीच्या नोकराशी असलेल्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितलं. त्यानंतर, नोकराची हत्या कशी होते हे सिनेमातील सर्वात मोठं धक्कादायक कथानक आहे.

नोकराच्या हत्येनंतर सिनेमा संपत नाही, सिनेमाला वेगळं वळण मिळतं… जेथे दोन मैत्रिणी एकमेकांसमोर येतात. दोन मैत्रिणींची भूमिका टिस्का चोप्रा आणि रसिका दुग्गल यांनी निभावलेली आहे. टिस्का एता गृहिणीच्या भूमिकेत आहे तर आदिल हुसैन सिनेमातीन मुख्य पात्र आहे. येथूनच नोकराच्या हत्येची संपूर्ण कहाणी सुरू होते. IMDb ने या सिनेमाला 10 पैकी 7.7 रेटिंग दिले आहेत. तुम्ही ही कॉमेडी, ड्रामा, सस्पेन्स आणि थ्रिलर लघुपट Amazon Prime वर पाहू शकता.