Shah Rukh Khan: तब्बल 100 कोटींच्या ‘मन्नत’ बंगल्याआधी किंग खान कुठे राहायचा?

'मन्नत' घेण्याआधी गौरीसोबत 'या' ठिकाणी राहायचा शाहरुख

Shah Rukh Khan: तब्बल 100 कोटींच्या मन्नत बंगल्याआधी किंग खान कुठे राहायचा?
शाहरुख खानचा मन्नत बंगला
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 02, 2022 | 1:33 PM

मुंबई- बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. ‘दिल दरिया’ या टीव्ही शोमधून त्याने अभिनयाची सुरुवात केली. टेलिव्हिजनवर लोकप्रियता मिळवल्यानंतर त्याने बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी शाहरुखला खूप संघर्ष करावा लागला. आज मुंबईतील त्याचा ‘मन्नत’ बंगला हा चाहत्यांसाठी जणू पर्यटनस्थळ बनला आहे. मात्र मन्नत बंगला खरेदी करण्यापूर्वी शाहरुख कुठे राहायचा, हे तुम्हाला माहीत आहे का?

मन्नत बंगला खरेदी करण्यापूर्वी शाहरुख त्याच्या पत्नीसोबत एका फ्लॅटमध्ये राहायचा. हा फ्लॅट वांद्रे याठिकाणी समुद्रकिनारी होता. एका मुलाखतीदरम्यान शाहरुखने या फ्लॅटचा उल्लेखसुद्धा केला होता.

मन्नतमध्ये शिफ्ट होण्याआधी तो अमृत नावाच्या एका बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये राहायचा. या फ्लॅटमध्ये कोणतीही आलिशान सुविधा उपलब्ध नव्हती. शाहरुख-गौरीचं हे घर सर्वसामान्यांप्रमाणे होतं. मन्नतमध्ये राहायला गेल्यानंतर शाहरुखने त्याचा फ्लॅट भाडेतत्त्वावर दुसऱ्यांना राहायला दिला.

1997 मध्ये शाहरुख जेव्हा ‘येस बॉस’ या चित्रपटाची शूटिंग करत होता, तेव्हा त्याची नजर मन्नत बंगल्यावर पडली. त्यावेळी ‘व्हिला विएना’ असं त्या बंगल्याचं नाव होतं. शाहरुखला हा बंगला इतका आवडला की त्याने तो खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

व्हिला विएना या बंगल्याचे मालक गुजराती व्यावसायिक नरीमन दुबाश होते. 2001 मध्ये किंग खाने जवळपास 13.32 कोटी रुपयांमध्ये तो बंगला विकत घेतला होता. आज त्याच मन्नत बंगल्यांची किंमत गगनाला भिडली आहे. या मन्नत बंगल्याचं इंटेरिअर डिझाइन खुद्द गौरी खानने केलं आहे.