Shah Rukh Khan | शाहरुखला विचारली ‘मुलीला इंप्रेस करण्याची’ टीप, अभिनेत्याच्या उत्तराने फॅनची बोलतीच झाली बंद !

शाहरूख खानने पुन्हा एकदा Twitter म्हणजेच X वर AskSRK सेशन सुरू केले. यावेळी त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना मजेशीर उत्तरे दिली.

Shah Rukh Khan | शाहरुखला विचारली मुलीला इंप्रेस करण्याची टीप, अभिनेत्याच्या उत्तराने फॅनची बोलतीच झाली बंद !
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 10, 2023 | 4:45 PM

मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : बॉलीवुड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या जवान (Jawan release) या आगामी चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. त्याचा हा बहुचर्चित चित्रपट पुढील (सप्टेंबर) महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अशा वेळी या चित्रपटाचा टीझर , ट्रेलर असो किंवा पोस्टर लाँच अथवा त्यातील एखादं गाण रिलीज होणार असो, प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच होते.

शाहरुखने नुकतंच या चित्रपटाचं आणखी एक पोस्टर (Jawan New poster) शेअर केलं असून त्यामध्ये त्याच्यासोबत विजय सेतुपति (Vijay Sethupathi) आणि नयनतारा हेही दिसत आहेत. हेच पोस्ट रिलीज झाल्यानंतर शाहरुखने त्याच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा #AskSRK सेशन सुरू केले. यावेळी त्याने चाहत्याच्या अनेक प्रश्नांची , काही मजेशीर ढंगातही उत्तरे दिली.

शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या रिलीजला महिन्याभरापेक्षा कमी वेळ उरला आहे. अशा वेळी तो चित्रपटाचे प्रमोशन वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात बिझी आहे. अलीकडेच त्याने एक पोस्टर रिलीज केले आहे ज्यामध्ये किंग खानसोबत विजय सेतुपती आणि नयनतारा देखील दिसले आहेत. यानंतर अभिनेत्याने #AskSRK सेशन सुरू केले. त्यावेळी एका फॅनने त्याला मुलगी पटवण्याच्या टिप्स विचारल्या असता शाहरुख त्याला रागावला. ‘ पहिले तर हे पटाना, पटाना, म्हणणं बंद करं, ते चांगलं वाटत नाही’ अस शाहरूख त्याला म्हणाला.

 

त्यानंतर शाहरूखने इतरही अनेक फॅन्सच्या प्रश्नांची उत्तरं दिली. एका चाहत्याने त्याला जवान चित्रपटातील बाल्ड लूक (bald look) बद्दल प्रश्न विचारला असता, त्यावरही त्याने मजेशीर उत्तरे दिली.

 

या चित्रपटाबद्दल बोलायचे तर शाहरुख खानचा ‘जवान’ हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. बॉक्स ऑफिसवर पठाणने धमाल केल्यानंतर शाहरुख आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.