मन्नत 300 कोटी, कृष्णा राज 250 कोटी.. बॉलिवूडच्या सर्वांत महागड्या घरांची किंमत

अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रणबीर कपूर यांसारख्या कलाकारांच्या बंगल्यांची खूप चर्चा होते. या सेलिब्रिटींचे चाहते त्यांच्या घराची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात.

मन्नत 300 कोटी, कृष्णा राज 250 कोटी.. बॉलिवूडच्या सर्वांत महागड्या घरांची किंमत
बॉलिवूड सेलिब्रिटींची महागडी घरं
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 17, 2026 | 2:40 PM

बॉलिवूडमधील कलाकारांची लोकप्रियता, त्यांची लाइफस्टाइल आणि आलिशान घरं नेहमीच चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय असतात. आपल्या आवडत्या कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्यांच्या घराबाहेर गर्दी करताना दिसतात. अशातच बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या मुंबईतील ‘मन्नत’ या बंगल्याच्या किमतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी 18 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या या बंगल्याची किंमत आता तब्बल 300 कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या आलिशान ‘कृष्णा राज’ बंगल्याची किंमतही 250 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

शाहरुख खानचा ‘मन्नत’

शाहरुख खानचा वांद्रे इथल्या समुद्रकिनाऱ्याजवळ असलेला ‘मन्नत’ बंगला बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी घरांपैकी एक आहे. सेलिब्रिटी वेल्थ मॅनेजर दीपक हिरो वाजिरानी यांनी एका पॉडकास्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार, शाहरुखने हा बंगला जवळपास 18 कोटी रुपयांना खरेदी केला होता. आज या प्रॉपर्टीची किंमत जवळपास 300 कोटी रुपये असल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजेच मन्नतच्या किमतीत तब्बल 17 पटीने वाढ झाल्याचा अंदाज आहे.

Loading...

सध्या या बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. एप्रिल 2025 मध्ये शाहरुख आणि त्याचं कुटुंब मन्नत सोडून दुसरीकडे राहायला गेलं. मन्नतच्या मागील बाजूला असलेल्या अ‍ॅनेक्सी इमारतीमध्ये आणखी दोन मजले बांधण्यात येत आहेत. यामुळे जवळपास 7 हजार चौरस फुटांची अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. या कामासाठी जवळपास 25 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती आहे.

रणबीर-आलियाचा कृष्णा राज बंगला

शाहरुखच्या मन्नतनंतर सर्वाधिक चर्चा आहे ती रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘कृष्णा राज’ बंगल्याची. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेला हा सहा मजली आलिशान बंगला जवळपास 250 कोटी रुपयांचा असल्याचं सांगितलं जातं. नोव्हेंबर 2025 मध्ये रणबीर आणि आलिया आपल्या मुलगी राहासह या नव्या घरात राहायला गेले. रणबीरची आजी कृष्णा राज कपूर यांच्या नावावरून या बंगल्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. याआधी हा बंगला राज कपूर आणि कृष्णा कपूर यांचा होता.

अमिताभ बच्चन यांच्या जलसाचीही कोट्यवधींची किंमत

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा जुहू इथला ‘जलसा’ बंगला देखील आलिशान सेलिब्रिटी घरांमध्ये गणला जातो. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बंगल्याची किंमत जवळपास 120 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

शाहरुख खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांच्या किमती सध्या अंदाजांवर आधारित आहेत. त्यांच्या किमती नोंदणीकृत मालमत्ता व्यवहारांद्वारे निश्चित केल्या जाऊ शकत नाहीत. या किमती मीडिया रिपोर्ट्स, अंतर्गत सूत्रांकडून मिळालेली माहिती आणि वेल्थ मॅनेजर्सच्या अंदाजांवर आधारित आहेत. त्यामुळे त्यांना अधिकृत बाजारभाव मानलं जाऊ शकत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us