Pathaan : सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे…; पाचव्या दिवशी ‘पठाण’ने किती कोटी कमावले?

सलग पाचव्या दिवशी शाहरुख खान स्टारर 'पठाण' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; रविवारी सिनेमाने केली इतक्या कोटी रुपयांची कमाई... फक्त भारतातच नाही तर, परदेशातही पठाण सिनेमाची क्रेझ...

Pathaan : सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे...; पाचव्या दिवशी पठाणने किती कोटी कमावले?
Pathaan : सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे...; पाचव्या दिवशी 'पठाण'ने किती कोटी कमावले?
| Updated on: Jan 30, 2023 | 8:37 AM

Pathaan BO Collection Day 5 : अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा गेल्या पाच दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमा करत आहे. तिसऱ्या दिवशी सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक लागला. पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान मजल मारली. भारतामध्ये ‘पठाण’ सिनेमाने चार दिवसांत २०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला, तर जगभरात सिनेमाने तब्बल ४०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या पठाण सिनेमाने अनेक हीट सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा आहे.

दरम्यान ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटमुळे पाचव्या दिवसाच्या कमाईचा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यांनी एक ट्विट करत पाचव्या दिवशी सिनेमा किती कोटी रुपयांचा कमाई करु शकतो..याचा अंदाज व्यक्त केला होता. रविवारी सिनेमा ६० ते ६२ कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल… असं तरण आदर्श यांनी एका ट्विटच्या माध्यमातून सांगितलं.

 

 

पठाण सिनेमाची जादू फक्त देशातच नाही तर, परदेशात देखील पाहायला मिळत आहे. जगभरात पठाण सिनेमाने ४२९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ट्रेड विश्लेषकांच्या अंदाजानुसार पाचव्या दिवसाची कमाई गृहीत धरली तर सिनेमा ५०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचेल असं सांगण्यात येत आहे. सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या ‘पठाण’ सिनेमाची चर्चा आहे.

‘पठाण’ ला मिळणार प्रतिसाद पाहून सिनेमाकडून चाहते आणि निर्मात्यांच्या आपेक्षा वाढताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करतो. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी साकारलेल्या भूमिकांची देखील चर्चा रंगत आहे. पठाण सिनेमात दीपिका जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. शिवाय सलमान खानची एक अप्रतिम कॅमिओ भूमिका चाहत्यांच्या मनात घर करत आहे. म्हणून पुन्हा मोठ्या पडद्यावर शाहरुख आणि सलमान खान यांना पाहणं चाहत्यांसाठी खास आहे.