
मुंबई : 18 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून किंग खान ‘जवान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. ‘जवान’ सिनेमात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसत आहे. याआधी किंग खान ‘रा.वन’ सिनेमात दुहेरी भूमिकेत झळकला होता. ‘रा.वन’ सिनेमात अभिनेता प्रथम वडिलांच्या भूमिकेत झळकला. त्यानंतर किंग खान याने ‘G. One’ या भूमिकेला न्याय दिला. सिनेमातील अभिनेत्याच्या दोन्ही भूमिकांना चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ‘रा.वन’ सिनेमात अरमान वर्मा याने शाहरुख खान याच्या मुलाची भूमिका साकारली होती. सिनेमा प्रदर्शित होवून १२ वर्ष उलटली आहेत.
१२ वर्षांनंतर अरमान शर्मा याचा लूक पूर्णपणे बदलला आहे.. सिनेमात अरमान प्रतीक या भूमिकेत दिसला. तेव्हा अरमान याच्या अभिनयाचं सर्वच स्तरातून मोठं कौतुक झालं. पण आता अरमान मोठा झाला आहे. अरमान याला आता पाहिल्यानंतर शाहरुख आणि अभिनेत्री करीना कपूर देखील हैराण होईल. सिनेमात करीना हिने अरमान याच्या आईची भूमिका बजावली होती.
अरमान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याचा जन्म २३ मार्च १९९९ साली मुंबईत झाला होता. अरमान इन्स्टाग्रामवर सक्रिय नाही. पण फेसबूकवर अरमान कायम कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत असतो. अरमान याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरमान वर्मा याची चर्चा रंगत आहे.
अरमान आता २४ वर्षांचा झाला. १२ वर्षांनंतर अरमान याला पाहिल्यानंतर तुम्ही देखील त्याला ओळखू शकणार नाही. अरमान वर्मा याच्या कुटुंबात अनाहिता आणि शनाया या दोन बहिणी आहेत. तसेच आई आणि बाबा आहेत. अरमान वर्माने मुंबईच्या बिलबोंग हाय इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.
अरमान वर्माने त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले असून तो लाइमलाइटपासून पूर्णपणे दूर असतो. तो सोशल मीडियावरही सक्रिय नाही. फेसबुकवर तो अधूनमधून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. पण आजही अरमान वर्मा याला चाहते विसरु शकलेले नाहीत.