Photo : शाहरुख खानचे ‘हमशकल’ माहितीयत? शाहरुख बनतात, डमी काम करतात

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचं नाव आज जगभरात ओळखलं जातं. शाहरुख खानचे अनेक चाहते आहेत. अनेक जण शाहरुखची स्टाईल कॉपी करतात. तर अनेक जण त्याच्यासारखे दिसतात. (Shah Rukh Khan's 'Humshakal', Becomes Shahrukh Khan works dummy )

  • Publish Date - 1:33 pm, Thu, 13 May 21
1/7
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचं नाव आज जगभरात ओळखलं जातं. शाहरुख खानचे अनेक चाहते आहेत. अनेक जण शाहरुखची स्टाईल कॉपी करतात. मात्र असे दोन चाहते आहेत जे शाहरुखसारखे दिसतात. ते आहेत प्रशांत वालदे आणि राजू रहिकवार. हे दोघं शाहरुख सारखे दिसत असल्यानं त्यांना चित्रपटात काम मिळतं. कामासाठी त्यांना दिवसाला 8 ते 10 हजार रुपये मिळतात. मात्र आता हे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.

2/7
राजू रहिकवारला बॉलिवूडमध्ये जूनियर शाहरुख खान म्हणून ओळखलं जातं. सलमान खानदेखील त्याचा चाहता आहे.

3/7
शाहरुखच्या बर्‍याच मोठ्या चित्रपटात राजू रहिकवारने डबल रोल म्हणून काम केलं आहे. त्याचबरोबर आता त्यांना काम मिळविण्यात खूप अडचणी येत आहेत.

4/7
या लोकांना कोरोना कालावधीत कोणतंही काम नाहीये, फेब्रुवारी महिन्यात माध्यमांशी बोलताना राजू रहिकवार म्हणाले की त्यांना कोणाच्याही आर्थिक मदतीची नाही तर फक्त कामाची गरज आहे. त्यांनी बऱ्याच दिवसांपासून वीज बिल भरलेलं नाही. ज्यामुळे त्यांच्या घराची वीज कोणत्याही वेळी कापली जाऊ शकते.

5/7
नागपुरात राहणारा प्रशांत वाल्डे हा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लूकलाइक आहे. मुंबईत राहत असताना तो शाहरुख खानची मिमिक्री करतो आणि घर चालवतो.

6/7
प्रशांत वालडे 16 वर्षांपूर्वी त्याच्या मूळ गावी नागपूरहून मुंबईला आले होते. त्यांनी मुंबई आणि बॉलिवूडमध्ये काम करुन ते येथे स्थायिक झाले. शाहरुखबरोबर त्यांनी अनेक जाहिराती शूट केल्या आहेत.

7/7
शाहरुख खानच्या अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये ते डमी म्हणून काम करतात. शॉट फायनल झाल्यानंतर शाहरुख खानला बोलवलं जातं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI