
नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : साऊथ सिनेमातील लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) ही लवकरच ‘जवान‘ (Jawan) चित्रपटात दिसणार आहे. किंग खान शाहरूख (shah rukh khan) याची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शनास तयार असून नुकताच त्याचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलरसह नयनताराने तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज आणले आहे. आत्तापर्यंत सोशल मीडियापासून दूर असणाऱ्या नयनताराने या प्लॅटफॉर्मवर धडाकेदार एंट्री केली आहे. तिने इन्स्टाग्राम वर डेब्यू करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
नयनताराने इन्स्टाग्रामवर केली एंट्री
आज, म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी शाहरूख खान व नयनतारा हिची भूमिका असेल्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला . त्याचसोबत नयनताराने इन्स्टाग्रामवरही पदार्पण केले असून त्यामुळे तिचे चाहते मात्र प्रचंड खुश झाले आहेत. इन्स्टाग्रामवर एंट्री केल्यावर तिने तिच्या जुळ्या मुलांसह एक स्पेशल व्हिडीओ देखील शेअर करत पोस्ट लिहीली आहे.
तसेच पहिल्या व्हिडीओनंतर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने ‘जवान’चा ट्रेलरही शेअर केला आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चाहत्यांना नयनतारा व शाहरूख या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्याची मोठी उत्सुकता आहे.
शाहरुख सोबत करणार रोमान्स
‘जवान’ हा नयनताराचा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. शाहरुख खानसोबत ती पहिल्यांदाच हिंदी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट ॲक्शन ओरिएंटेड असून ‘चलेया’ आणि ‘रमैया वस्तावैया’ या दोन गाण्यांमध्ये नयनतारा व शाहरूख या दोघांची उत्तम केमिस्ट्री पहायला मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांचा रोमान्सही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘जवान’ हा शाहरुख खानचा दिग्दर्शक एटली कुमारसोबतचा पहिला चित्रपट आहे. एटली कुमार याचेही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे.
नयनतारा आणि विग्नेश शिवान या दोघांनी ऑक्टोबर 2022 मध्ये गुड न्यूज शेअर केली होती. सरोगसीच्या माध्यमातून ते जुळ्या मुलांचे पालक बनले.