ना सुहाना, ना गौरी; शाहरुख खानच्या फोनवर आहे या खास व्यक्तीचा वॉलपेपर

शाहरुख खानचा फोनचा वॉलपेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर त्यांचा एका खास व्यक्तीचा फोटो आहे. हे पाहून चाहत्यांनी त्याच्या प्रेमाचे कौतुक केले आहे. त्यामुळे हा शाहरूख खानचा फोनच्या वॉलपेपरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

ना सुहाना, ना गौरी; शाहरुख खानच्या फोनवर आहे या खास व्यक्तीचा वॉलपेपर
| Updated on: Dec 22, 2024 | 1:14 PM

अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या अभिनयासोबतचं त्याच्या स्वभावामुळे, तसेच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. तसेच तो एक फॅमिलीमॅन म्हणूनही त्याचे कौतुक होते. तो नेहमी त्याच्या कुटुंबासाठी उभा असतो, विशेषत: त्याच्या मुलांच्या बाबतीत तो नेहमीच तत्पर असतो. पण तुम्हाला माहितीये का की त्याच्या फोनच्या वॉलपेपर व्हायरल झाला आहे. आणि त्यावर एका खास व्यक्तीचा फोटो आहे.

शाहरुख खानचा फोनचा वॉलपेपर व्हायरलं

शाहरुख खान आपल्या कुटुंबावर किती प्रेम करतो हे सर्वांनाच माहित आहे. शाहरुख खानने अनेकदा आपली तीन मुलं आणि पत्नी गौरी खानवर असलेले प्रेम कायम व्यक्त केले आहे. तो सार्वजनिक ठिकाणी सुहाना आणि अबरामची विशेष काळजी घेताना देखील दिसतो. आता शाहरुख खानच्या फोनचा वॉलपेपर व्हायरल होत आहे. या वॉलपेपर ना सुहाना, ना गौरीचा फोटो आहे. त्याच्या फोनच्या वॉलपेपरवर एका खास व्यक्तीचा फोटो आहे. आणि त्याच्या वॉलपेपरमध्ये त्याच व्यक्तीचे वेगवेगळ फोटो शाहरूख ठेवताना दिसतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल ही खास व्यक्ती आहे तरी कोण?

शाहरुख खानच्या फोनवर खास व्यक्तीचा वॉलपेपर

शाहरुख म्हटलं की तिथे पापाराझी आणि चाहतेतर असणारच. ते त्याचे फोटो व्हिडीओ काढतात. त्याच्यासोबत सेल्फी घेतात. अशाच एक -दोन प्रसंगांवेळी शाहरूखच्या फोनचा वॉलपेपर आता व्हायरल झाला आहे. त्यावरून चाहत्यांना हे समजलं की त्याच्या फोनचा वॉलपेपरवर त्या खास व्यक्तीसाठीच आहे. ती खा व्यक्ती म्हणजे शाहरूखचा सर्वात लहान मुलगा अबराम खानचा फोटो असल्याचे दिसून आले आहे.

वॉलपेपरवरचा फोटो पाहून नेटकऱ्यांची कमेंट 

फोनवर असलेल्या वॉल पेपरची चर्चचा रंगली आहे. त्याच्या फोनच्या वॉल पेपरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये शाहरुखच्या फोनवर त्याचा धाकटा मुलगा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका युजरने शाहरुख खानच्या वॉलपेपरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत शाहरुखचा फोन दिसत आहे. त्याचवेळी त्या फोनवर अबराम खानचा एक फोटो दिसत आहे. हा वॉलपेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

वॉलपेपरवर नेटकऱ्यांच्या कमेंटस्

सोशल मीडियावर शाहरुखच्या फोनचा वॉलपेपर व्हायरल झाल्यावर अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलं आहे ‘अरे वाह शाहरुखने त्याचा मुलगा अबरामचा फोटो वॉलपेपर म्हणून ठेवला आहे’तर, एका यूजरने म्हटलं आहे ‘शाहरुख खानचे त्याच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे’ अशा भरभरून कमेंट शाहरुखच्या या वॉलपेपरसाठी आल्या आहेत.

2013 साली शाहरुखला तिसरा मुलगा म्हणजे अबराम झाला. अबराम हा सरोगसीच्या माध्यमातून झालेला मुलगा आहे. शाहरुखच्या तिन्हीही मुलांची कायम चर्चा रंगलेली असते. सुहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे तर आर्यनची वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे.