शाहरुख खानचा लेक विदेशी मुलीच्या प्रेमात? ब्राझिलच्या ‘या’ सुंदर मुलीला करतोय डेट, अख्या कुटुंबालाही..
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शाहरुख खान हाच नाही तर त्याचा लेक आर्यन खान हा देखील चर्चेत असतो. आर्यन खान सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. नुकताच आर्यन खानबद्दल मोठी माहिती पुढे येतंय.
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा लेक आर्यन खान हा कायमच चर्चेत असतो. आर्यन खान याची वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आर्यन खान हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतो. आर्यन खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आर्यन खान हा त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. आर्यन खान हा अनन्या पांडे हिला डेट करत असल्याची चर्चा होती. आर्यन खान याच्या पर्सनल लाईफवर चाहत्यांच्या बारीक नजरा असतात. आर्यन खान याला काही दिवस जेलमध्ये राहण्याची देखील वेळ आली.
आर्यन खान हा ब्राजिलियन अभिनेत्री लॅरिसा बोन्सी हिला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर आर्यन खान तिच्या कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्यांना सोशल मीडियावर फाॅलो करतो. लॅरिसा बोन्सी हिच्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशीही आर्यन खान याने सुंदर गिफ्ट पाठवले होते. आता लॅरिसा बोन्सी आणि आर्यन खान यांचे काही फोटोही व्हायरल होत आहेत.
लॅरिसा बोन्सी आणि आर्यन खान हे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर आर्यन खान आणि लॅरिसा बोन्सी हे एका इव्हेंटही एकत्र दिसले. या इव्हेंटमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यावर कमेंट करत एका युजर्सने लिहिले की, मी काही दिवसांपूर्वीच वाचले होते की, हे दोघे डेट करत आहेत.
View this post on Instagram
दुसऱ्याने लिहिले की, आर्यन खान हा फक्त लॅरिसा बोन्सी डेट करत नाही तर तिच्या संपूर्ण कुटुंबाला सोशल मीडियावर फाॅलो देखील करतो. मला वाटतंय की, लॅरिसा बोन्सीसोबत आर्यन खान लग्नच करणार आहे. लॅरिसा बोन्सी ही एक डान्सर आणि माॅडल आहे. लॅरिसा बोन्सी हिने अनेक म्यूझिक व्हिडीओ देखील केले आहेत.
लॅरिसा बोन्सी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते. लॅरिसा बोन्सी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. लॅरिसा बोन्सी आणि आर्यन खान यांची पहिली भेट विदेशात झाल्याचे सांगितले जाते. लॅरिसा बोन्सी आणि आर्यन खान काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे देखील काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.