शाहरूखच्या लेकाचं होतंय कौतुक; स्टारडमच्या सेटवर नेमकं काय घडलं? नेटकरी तर एकदम फिदाच

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची स्टारडम ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टारडम सेटवरील आर्यनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी शाहरूखच्या लेकाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. स्टारडमच्या सेटवर नेमकं काय घडलं?

शाहरूखच्या लेकाचं होतंय कौतुक; स्टारडमच्या सेटवर नेमकं काय घडलं? नेटकरी तर एकदम फिदाच
| Updated on: Jan 28, 2025 | 7:50 PM

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती सध्या तिच्या दिग्दर्शनातील पदार्पण मालिका स्टारडममध्ये व्यस्त आहे. शूटिंग सेटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये आर्यन खान वर्क मोडमध्ये कसा दिसतो हे बघायला मिळते.

 आर्यन खानचा स्टारडमच्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता लवकरच एका सीरीजच्या माध्यमातून बॉलिवूड एन्ट्र्रीसाठी सज्ज झाला आहे. ही सीरिज पाहण्यासाठी नक्कीच सर्व प्रेक्षकांनाच उत्सुकता आहे. भलेही त्याची ही सीरिज ओटीटीवर रिलीज होणार असली तरीही ही सीरिजच आर्यनला बॉलिवूड एन्ट्री मिळवून देणारी असणार आहे.

दरम्यान या सीरिजवरील कामही जोरात सुरू आहे. आर्यन खान या मालिकेचे दिग्दर्शन करत आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे ही वेब सिरीज म्हणजे बॉलिवूड आणि इंडस्ट्रीतील बड्या स्टार्सना ट्रिब्यूट आहे. आता या सिरीजच्या शूटिंग दरम्यानचा सेटवरील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये आर्यन खान क्रू मेंबर्ससोबत बिझी असल्याचं आणि खूपच गंभीर दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

स्टारडमच्या सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आर्यन खान सेटवर पूर्णपणे गुंतलेला दिसतोय. तो क्रू मेंबर्सना दिशा देताना आणि सूचना देताना दिसतोय.

तो सेटचा आढावा घेत असल्याचं दिसत आहे. साहजिकच हा त्याचा पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासाठी नक्कीच तो खूप खास आहे त्यामुळे आर्यन या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेताना दिसत आहे. शाहरुख खानही आपल्या मुलाच्या कामाबद्दल खूप उत्सुक दिसत आहे. रिपोर्टनुसार शाहरूख कधीकधी शूटिंग सेटवरही जातो आणि आर्यनच्या कामाची दखलही घेतो.

या व्हिडिओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत

आर्यनच्या या व्हिडिओवर नेटकरीही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. आर्यनच्या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत त्याला ‘ बेस्ट ऑफ लक’ म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत, तर दुसऱ्या एका युजरने सीरिजची शुटींग कधी पू्र्ण होणार अशी विचारणा करण्यात आली आहे. आणखी एका युजरने म्हटलं आहे “तो भविष्यात मोठा दिग्दर्शक बनेल”, याशिवाय चाहते आर्यनला या सीरिजसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

रणबीर-बॉबीने शूटिंग पूर्ण केले आहे

आर्यन खानच्या स्टारडम या मालिकेबद्दल सांगायचे तर, 2025 च्या अखेरीस ती स्ट्रीम करण्याची योजना आहे. या मालिकेत एकूण 6 भाग असतील आणि ते सर्व नेटफ्लिक्सवर प्रसारित होतील. आतापर्यंत शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर, बॉबी देओल आणि बादशाह यांनी या मालिकेचे शूटिंग पूर्ण केले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यातच त्याचे शूटिंग सुरू झाले होते. बॉलीवूड प्रेमी आता ही सीरिज येण्याची वाट पाहत आहेत.