Shah Rukha Khan: शत्रुघ्न सिन्हांनी ‘त्या’ दिवशी का मौन बाळगलं! शाहरुख खानचं उत्तर; बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण!

Shah Rukha Khan: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेता शाहरुख खान सर्वत्र चर्चेत आले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांच्या एका पोस्टमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त शत्रुघ्न सिन्हा - शाहरुख खान यांची चर्चा रंगली आहे.

Shah Rukha Khan: शत्रुघ्न सिन्हांनी त्या दिवशी का मौन बाळगलं! शाहरुख खानचं उत्तर; बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण!
Shah Rukh Khan
| Updated on: Nov 06, 2026 | 11:12 AM

Shah Rukh Reply To Shatrughan Sinha : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेता शाहरुख खान सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सांगायचं झालं तर 2 नोव्हेंबर रोजी शाहरुख खान याचा वाढदिवस होता. अभिनत्याने 61 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील किंग खानवर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी उशिरा वाढदिवसाच्या शुभेच्छ दिल्यानंतर किंग खानने देखील त्याच्या अंदाजात आभार व्यक्त केले आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, त्यांची पोस्ट एक दिवस उशिरा आली होती, ज्यामध्ये त्यांनी ‘बिलेटेड बर्थडे शाहरुख’ असं लिहिलं होतं. आता दोन दिवसांनी शाहरुखने त्यांचे आभार मानले आहेत.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या उशिरा आलेल्या वाढदिवसाच्या पोस्टला उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, उशिरा असो वा वेळेवर, त्यांच्याकडून मिळालेल्या शुभेच्छा त्यांच्या डायलॉग्ससारख्य दमदार असतात. शाहरुखने 5 नोव्हेंबरच्या संध्याकाळी उत्तर देत लिहिलं, “शत्रूजी, शुभेच्छा उशिरा मिळोत किंवा वेळेवर, तुमच्या शुभेच्छा नेहमी तुमच्या डायलॉगसारख्याच येतात… पूर्णपणे दमदार! या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल खूप खूप धन्यवाद.”

Loading...

शत्रुघ्न सिन्हा यांनी शुभेच्छा देताना काय म्हटलं?

शत्रुघ्न सिन्हा यांनी शाहरुख खानला शुभेच्छा देताना X वर लिहिलं, “शाहरुखला वाढदिवसाच्या थोड्या उशिराने, पण जाणीवपूर्वक दिलेल्या शुभेच्छा. तुम्ही एक ‘पॉवरहाऊस’ आहात, त्यामुळे काल नक्कीच ‘हाऊसफुल’ राहिला असेल. प्रत्येकजण तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही सर्वात आकर्षक, करिश्माई आणि सर्वात प्रतिष्ठित अभिनेता आहात. तुमच्या येत्या आयुष्यात भरपूर आनंद, शांतता, समृद्धी आणि दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो, हीच सदिच्छा.”

रिद्धी डोगराचेही मानले आभार

शाहरुख खानने केवळ शत्रुघ्न सिन्हा यांचेच नव्हे, तर X वर इतरही अनेक कलाकारांचे आभार मानले, ज्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. शाहरुखने रिद्धी डोगराचेही आभार मानले, जिने ‘जवान’ सिनेमात त्याच्या आईची भूमिका साकारली होती. रिद्धीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अशी पोस्ट केली की, “किंगला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुम्ही नेहमी निरोगी आणि आनंदी रा

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us