AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता ओंकार भोजनेचा दिग्दर्शकाविरोधात 50 लाखांचा दावा, नोटीस बजावली; काय आहे प्रकरण?

अभिनेता ओंकार भोजनेने दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या विरोधात 50 लाखांचा मानहानी दावा दाखल केला आहे. एका मुलाखतीत कवडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. कवडे यांनी आरोपांना प्रत्युत्तर देत आपली बाजू मांडली आहे. हे 'आफराताफरी' चित्रपटाच्या प्रसिद्धीशी संबंधित प्रकरण असून, दोन्ही बाजूंनी जोरदार दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

अभिनेता ओंकार भोजनेचा दिग्दर्शकाविरोधात 50 लाखांचा दावा, नोटीस बजावली; काय आहे प्रकरण?
onkar bhojaneImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2026 | 11:16 AM
Share

प्रसिद्ध अभिनेता ओंकार भोजने याने ‘आफराताफरी’ या सिनेमाचे दिग्दर्शक आणि सहनिर्माते मिलिंद झुंबर कवडे यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. ओंकारने कवडे यांना 50 लाख रुपयांच्या मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. कवडे यांनी एका मुलाखतीत ओंकारबद्दल आक्षेपार्हय विधाने केली होती. त्यामुळे ओंकारने ही नोटीस बजावली आहे. प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्या मार्फत ही नोटीस बजावली आहे.

काय आहे प्रकरण?

दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी एका डिजिटल माध्यमाला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी ओंकार भोजनेवर अत्यंत गंभीर आणि बदनामीकारक विधाने केली होती. चित्रपटाच्या प्रसिद्धीला उपस्थित न राहिल्याचा आरोप करत कवडेंनी भोजनेची तुलना ‘सराईत पाकीटमार’ तसेच ‘सराईत खोटारडा’ अशी केली होती. ही मुलाखत आणि त्याचे स्निपेट/व्हिडिओ क्लिप्स समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आल्यामुळे ओंकार भोजने यांनी कवडे यांना नोटीस बजावली आहे, अशी माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली आहे.

ओंकारच्या नोटिशीतील मुद्दे

नियोजनात वारंवार बदल : चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण झाले होते. त्यानंतर चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा निर्मात्यांकडून वारंवार बदलण्यात आल्या (आधी 3 सप्टेंबर आणि नंतर 9 ऑक्टोबर 2026). भोजने यांच्या पूर्वनियोजित व्यावसायिक कामांमुळे त्यांना अचानक बदललेल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही.

चित्रपटाच्या प्रसिद्धीस सहकार्य : व्यस्त वेळापत्रक असूनही ओंकार भोजनेने दोन माध्यमांना चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मुलाखती दिल्या होत्या. स्वतःचे वैयक्तिक सोशल मीडिया खाते नसतानाही त्यांनी वैयक्तिक ब्रॉडकास्ट संदेशांद्वारे सुमारे 130 संपर्कांना चित्रपटाचे अधिकृत टीझर, ट्रेलर व गाणी पाठवून प्रचार केला होता.

प्रतिष्ठेचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न : मुलाखतीतील आक्षेपार्ह विधानांमुळे प्रतिष्ठा दुखावली असतानाही, ‘आफराताफरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत ओंकारने ही नोटीस पाठवली नव्हती.

कायदेशीर मागण्या : भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 356 (मानहानी) अंतर्गत तसेच दिवाणी कायद्यानुसार मिलिंद कवडे यांनी केलेल्या सर्व विधानांची जाहीर बिनशर्त माफी मागावी, विधाने मागे घ्यावीत, भविष्यात अशी विधाने करू नयेत आणि 50,00,000/- (पन्नास लाख रुपये) भरपाई द्यावी. दिवाळीनंतर दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मिलिंद कवडे यांचे उत्तर काय?

या कायदेशीर नोटिशीला उत्तर देताना मिलिंद कवडे यांनी त्यांच्या वकील ॲड. दीपाली आर. बोहरा यांच्यामार्फत 30 पानांचे सविस्तर कायदेशीर प्रत्युत्तर पाठवले असून, त्यात कवडेंनी आपले म्हणणे मांडले आहे.

मानहानीचे आरोप फेटाळले : मिलिंद कवडे यांनी 50 लाखांच्या भरपाईची मागणी आणि माफीनामा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. आपण कोणतीही बदनामीकारक किंवा द्वेषभावनापूर्ण विधाने केली नसून, चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या उपलब्धतेबाबत निर्माते-दिग्दर्शकांना येणाऱ्या अडचणींवर व्यावसायिक अनुभवातून ते वक्तव्य केले होते, असा दावा त्यांनी केला.

‘पाकीटमार’ शब्दाचा खुलासा : मुलाखतीत वापरलेला ‘सराईत पाकीटमार’ हा शब्द केवळ एका सर्वसामान्य संदर्भाचा भाग होता आणि तो थेट ओंकार भोजने याच्यासाठी वापरला नव्हता, असा खुलासा कवडेंनी केला आहे.

असहकार्याचे आरोप:

चित्रीकरणादरम्यान आणि डबिंगच्या वेळी भोजने यांनी वारंवार विलंब केला, ज्यामुळे पोस्ट-प्रॉडक्शनचे वेळापत्रक बिघडले.

पोस्टर शूटसाठी अनेक ज्येष्ठ कलाकारांनी वेळ दिला, पण भोजने उपलब्ध न झाल्याने अखेर एआय-जनरेटेड पोस्टर रिलीज करावे लागले, ज्यावर सोशल मीडियावरून टीका झाली.

प्रसिद्धीसाठी इतर कलाकारांप्रमाणे 30 सेकंदांचा साधा सेल्फी व्हिडिओ मागूनही वारंवार सांगून त्यांनी तो पाठवला नाही.

28 सप्टेंबरच्या पुण्यातील पूर्वदिवसाच्या प्रसिद्धी दौऱ्याला ऐनवेळी केवळ 4 तास उपलब्ध असल्याचे सांगून तो दौरा रद्द करावा लागल्याचा आरोपही कवडेंनी केला.

Follow Us
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास बंदी; मोठं कारण समोर?
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन!
प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
Praful Patel Met Sharad Pawar : प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...