AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhanteras 2026: आज धनत्रयोदशीला सोने खरेदी करणार आहात? तर आधीच ‘या’ 5 गोष्टी नक्की तपासा

Gold Buying Tips on Dhanteras 2026: आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर आधीच काही गोष्टी जाणून घेणे फार महत्त्वाचं आहे.

Dhanteras 2026: आज धनत्रयोदशीला सोने खरेदी करणार आहात? तर आधीच 'या' 5 गोष्टी नक्की तपासा
gold buying tipsImage Credit source: PTI
| Updated on: Nov 06, 2026 | 11:21 AM
Share

आपल्या भारतीय परंपरेत धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या शुभ प्रसंगी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. आज धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक लोक सोने-चांदीचे दागिने किंवा नाणी खरेदी करतील. थोडं का असेना सोनं खरेदी करण्याची प्रथा आपल्याकडे फॉलो केली जाते. यामुळे सोन्याच्या किंमतीकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या असतात. मात्र, सोने खरेदी करताना केवळ धातूच्या किमतीवर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नसते. कारण त्यासोबत अनेक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचं असते. सोन्याच्या मूळ किंमतीसोबत अतिरिक्त खर्चांचा समावेश असतो. यामुळेच किंमतीवर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे, दिवाळीत सोने खरेदी वेळी बिलामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व घटकांची काळजीपूर्वक तपासणी करा. नेमकं काय तपासायचं याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

बिल चेक करताना ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

1.सोन्याचा दर आणि कॅरेट तपासा

ज्वेलरी बिलमध्ये सर्वात मोठा भाग त्या दिवसाची सोन्याच्या किंमत. वेगवेगळ्या ज्वेलर्सकडे सोन्याच्या दरात थोडा फरक असू शकतो. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी प्रति ग्रॅम सोन्याचा त्या दिवसाचा दर नक्की तपासा. कारण की, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर वेगळे असतात. त्यामुळे तुम्ही खरेदी केलेलेच दर तिथे आहेत की नाही हे जाणून घ्या.

2. मेकिंग चार्ज बघणेही महत्त्वाचे!

तुम्ही सोन्याची कोणतीही ज्वेलरी खरेदी करताना त्यावर मेकिंग चार्ज अर्थात करणावळ द्यावी लागते. याचा अर्थ हा दागिने डिझाइन आणि तयार करण्याचा खर्च असतो. कधी हा दर प्रत्येक ग्रॅमप्रमाणे आणि सोन्याच्या किमतीच्या टक्केवारीप्रमाणे घेतात. जेवढी डिझाईन किचकट तेवढा मेकिंग चार्ज जास्त. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी विचारा की मेकिंग चार्ज किती टक्के आहे किंवा किती रुपये प्रती ग्रॅम आहेत.

3. वेस्टेज चार्ज

काही वेळा ज्वेलर्स दागिने बनवताना सोने वाया जाण्याच्या नावाखाली वेगळे वेस्टेज चार्ज घेतात, जे अनेक ठिकाणी मेकिंग चार्जमध्येच समाविष्ट असते. हे काळजी घेणे महत्त्वाचे आहे की एका खर्चासाठी तुम्हाला दोनदा पैसे देऊ न लागता.

4. BIS हॉलमार्क आणि HUID पाहणे गरजेचे

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी BIS हॉलमार्क खूप महत्त्वाचा आहे. दागिने खरेदी करताना त्यावर असलेला हॉलमार्क आणि HUID नंबर नक्की तपासा. बिलातही सोन्याची शुद्धता आणि हॉलमार्कसंबंधी माहिती असावी. हॉलमार्किंगसाठी वेगळा शुल्क घेतला असेल तर त्याची माहितीही मागा. यामुळे ग्राहकाला खरेदी केलेल्या सोन्याची शुद्धता आणि बिलात लागलेले शुल्क समजायला मदत होईल.

5. बिलमधलं GST

सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर 3% GST लागतो. त्यामुळे बिलात GST ची गणना आणि त्याचा वेगळा उल्लेख नक्की पहा. ग्राहकाने तपासायला हवे की टेक्स बरोबर जोडलेला आहे की नाही आणि बिलात GST ची रक्कम स्पष्टपणे दाखल केलेली आहे की नाही. यामुळे एकूण पेमेंटची बरोबर माहिती मिळते.

Follow Us
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास बंदी; मोठं कारण समोर?
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन!
प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
Praful Patel Met Sharad Pawar : प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...