रेल्वे आणि बस प्रवासातही रियाज करायचे; लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे हे किस्से माहीत आहेत काय?
लोकशाहीर विठ्ठल उमप यांना ओळखत नाही असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. (shahir vitthal umap was continuously singing practice till death)
मुंबई: लोकशाहीर विठ्ठल उमप यांना ओळखत नाही असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. विठ्ठल उमप आज आपल्यात नाहीत, पण त्यांची गाणी, नाटक आणि आठवणी आजही मराठी मनावर रुंजी घालत आहेत. विठ्ठल उमप यांच्याशी 2007 साली प्रत्यक्ष भेट झाली होती. तब्बल चार ते पाच तास त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी त्यांची शाहीर म्हणून झालेली जडणघडण सांगतानाच काही किस्सेही ऐकवले. (shahir vitthal umap was continuously singing practice till death)
रियाजात खंड नाही
विठ्ठल उमपदादांनी वयाच्या 79व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नागपूरच्या दीक्षाभूमीवर आंबेडकरी गीतांचा जलसा सुरू असतानाच त्यांना स्टेजवर मृत्यू आला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. वयाच्या 79व्या वर्षापर्यंत ते रियाज करायचे. एक दिवसही ते रियाजामध्ये खंड पडू देत नव्हते. अगदी बस आणि रेल्वे प्रवासातही ते रियाज करायचे. रियाजासाठी ते वेळेचं बंधन पाळत नसत. रात्री-अपरात्री उठून ते रियाज करायचे.
कव्वाली-लोकसंगीत एकत्र आणण्याचा अभिनव प्रयोग
उमपदादा केवळ लोकशाहीर नव्हते. तर ते प्रयोगशील कलावंत होते. गाण्यातच नव्हे तर कलाप्रकारातही त्यांनी प्रयोग केले. कव्वाली आणि लोकसंगीताला एकत्र करून सादर करण्याचा त्यांनी अभिनव प्रयोग केला. असा प्रयोग करणार ते एकमेव कलावंत आहेत. सरोजीनी बाबर यांचं एक होता राजा हे पुस्तक त्यांच्या वाचनात आलं. या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला. या पुस्तकातील पारंपारिक गाणी दादांच्या घरातही गायली जायची. त्यातूनच त्यांना कव्वाली आणि लोकसंगीत एकत्र करण्याची कल्पना सूचली. त्यानुसार ते कव्वालीच्या कार्यक्रमात मध्येच लोकगीत गायचे. या नव्या प्रकाराला रसिकांनीही प्रचंड दाद दिली होती.
50 वर्षे ‘दादा’गिरी
दादांनी 1960 पासून गाणअयाचे कार्यक्रम सुरू केले. 2010 पर्यंत म्हणजे अक्षरश: शेवटच्या श्वासापर्यंत ते गात होते. शाहीरी क्षेत्रातील त्यांची ही ‘दादा’गिरी तब्बल 50 वर्षे सुरू होती. त्यांनी गाण्याचे जवळजवळ सर्वच प्रकार हाताळले. गाण्याचा क्विचतच एखादा प्रकार त्यांच्याकडून हाताळण्याचा राहिला असेल. शाहीरीपासून ते गझल, अभंग, भारूड, अखंड, गणगवळण, समूहगाण, भावगीते, कोळीगीते, भक्तीगीते, आंबेडकरी गीते, पोवाडे, स्मरणगीते आणि तमाशाप्रधान गीतेही त्यांनी गायली. एवढा मोठा त्यांच्या गायकीचा अवाका होता.
शाहीरही घडवले
दादांनी शाहीरीचा हा ठेवा आपल्या पुरता मर्यादित ठेवला नाही. तर त्यांनी असंख्य शाहीरही घडवले. शाहीर शिवाजीरावा इंगरुळकर, शाहीर एस. मुंबरकर, शाहीर विठ्ठल नांदूरकर (गायकवाड) आणि शाहीर सुखदेव जाधव हे शाहीर आजही दादांचा वारसा हा समर्थपणे पुढे नेत आहेत. (shahir vitthal umap was continuously singing practice till death)
बुद्धपूत्रं असल्याचा अभिमान
27 मे 2007 मध्ये रेसकोर्सवर झालेल्या धम्म सोहळ्यात भदंत राहुल बोधी यांनी लाखो लोकांच्या साक्षीने ‘विठ्ठल उमप बुद्धपूत्रं है’, अशी तीनदा घोषणा केली होती. ही घोषणा त्यांना अत्यंत प्रिय होती. आपण बुद्धपूत्रं असल्याचा त्यांना सार्थ अभिमान वाटायचा. (साभार, आंबेडकरी कलावंत) (shahir vitthal umap was continuously singing practice till death)
संबंधित बातम्या:
बाप महाराष्ट्राचा स्वर सम्राट, मुलगा सेंच्युरी मिलमध्ये; अशी झाली मिलिंद शिंदेंची जडणघडण
आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?
(shahir vitthal umap was continuously singing practice till death)