प्रल्हाद शिंदेची ‘अंतिम इच्छा’, ‘या’ कॅसेटसाठी पत्नीचे दागिने मोडले; आनंद शिंदेंचा मन हेलावणारा किस्सा

लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांचे अनेक किस्से आहेत. काही सुखद तर काही मनाला चटका लावणारे. (how anand shinde sold wife's ornaments for cassette?, read story)

प्रल्हाद शिंदेची 'अंतिम इच्छा', 'या' कॅसेटसाठी पत्नीचे दागिने मोडले; आनंद शिंदेंचा मन हेलावणारा किस्सा
anand shinde
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 2:04 PM

मुंबई: लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांचे अनेक किस्से आहेत. काही सुखद तर काही मनाला चटका लावणारे. मन सुन्न करणारे. पडत्या काळातील आठवणींना उजाळा देणारे. त्यांचे वडील प्रल्हाद शिंदे यांच्या बाबतीतील असाच एक किस्सा आहे. तो त्यांनीच सांगितलेला… (how anand shinde sold wife’s ornaments for cassette?, read story)

प्रल्हाद शिंदे यांची ‘अंतिम इच्छा’

आपल्या लोकगीतं आणि भक्तीगीतांमुळे प्रल्हाद शिंदे अवघ्या महाराष्ट्राला परिचित झाले होते. प्रत्येक घरात त्यांच्या गाण्याची कॅसेट वाजत होती. पण प्रल्हाद शिंदे यामुळे समाधानी नव्हते. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाण्याची कॅसेट काढायची होती. पण ही इच्छा काही पूर्ण होताना दिसत नव्हती. त्यासाठी पैसा अडवा येत होता. शेवटी प्रल्हाददादांनी मुलांना ही इच्छा बोलून दाखवली. प्रल्दाद शिंदे यांचं हे स्वप्न त्यांची सून आणि आनंद शिंदे यांची पत्नी विजया यांनी पूर्ण केलं. विजया यांनी अंगावरील सर्व दागिने मोडले. त्यातून 35 हजार रुपये मिळाले. हे पैसे त्यांनी प्रल्हाददादांना दिले आणि या पैशातून ‘अंतिम इच्छा’ ही बाबासाहेबांवरील गाण्याची कॅसेट बाजारात आली. विशेष म्हणजे या कॅसेटमधील गाण्यांना आनंद शिंदे यांनी संगीत दिलं आहे. तर यातील एक गाणं प्रसिद्ध लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी लिहिलं आहे.

या बाळांनो अखेरचीही, इच्छा माझी पाळा, भीमरायाला जिथे जाळले, तिथे मलाही जाळा…!!!

विठ्ठल उमप यांनी लिहिलेलं हे गाणं प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं होतं. प्रल्हाददादांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्डिंग होत असताना स्टुडिओमध्ये सर्वजण रडले होते, अशी आठवणही ते सांगतात. हे गाणंही त्या काळी तुफान गाजलं होतं.

डबल मिनिंग म्हणजे काय रे भाऊ?

आनंद शिंदे यांच्यावर डबल मिनिंगची गाणी गात असल्याचा सातत्याने आरोप होतो. त्यावर त्यांनी अनेक प्लॅटफॉर्मवर स्पष्टीकरणही दिलं आहे. माझ्या गाण्यात केवळ एकच अर्थ आहे. मी द्विअर्थी गाणी गात नाही. माझ्या गाण्याच्या पहिल्याच अंतऱ्यात त्या गाण्याचा मतितार्थ येते. पहिल्या किंवा दुसऱ्या ओळीतच गाणं कशावर बेतलं आहे. हे येतं. त्यामुळे गाणं डबल मिनिंगचं आहे असं म्हणता येणार नाही. गाणं अश्लीलतेकडे जातं असं म्हणणंही चुकीचं आहे, असं ते सांगतात. तसेच आपल्या गाण्यांना पुरुषांपेक्षा महिलांचाच जास्त प्रतिसाद असतो, असंही ते सांगतात.

चित्रपटाच्या कॅसेटवर फोटो छापलेला एकमेव गायक

आनंद शिंदे यांनी अनेक सिनेमात गाणी गायली आहेत. पोपटाचं गाणं हिट झाल्यानंतर त्यांचं हे गाणं ‘चल रे लक्ष्या मुंबईला’ या सिनेमात घेण्यात आले. आनंद यांच्या आवाजातच हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. पण प्रत्यक्षात सिनेमातून त्यांचा आवाज गायब करण्यात आला. आपली फसवणूक झाल्याने नाराज झालेल्या आनंद यांनी ही बाब संगीतकार अनिल मोहिले यांच्या लक्षात आणून दिली. मोहिले यांनी ही या गोष्टीचं गांभीर्य जाणून घेऊन त्याची परतफेड म्हणून आनंद शिंदे यांना तीन-चार चित्रपटात गायनाची संधी दिली. तसेच चित्रपट गीतांच्या कॅसेटवर त्यांचा फोटोही छापला. मराठी चित्रपटांच्या इतिहासात चित्रपटांच्या कॅसेटवर फोटो छापलेले आनंद हे पहिले गायक आहेत.

कोंबडी पळाली… पण दोन वर्षानंतर

आनंद शिंदे यांच्या गाण्यांचे अनेक किस्से आहेत. त्यांचं पोपटाचं गाणं मार्केटमध्ये आलं. पण ते फारसं चाललं नव्हतं. त्यासाठी रेडिओ आणि वृत्तपत्रातून जाहिराती द्याव्या लागल्या. त्यानंतर त्यांचं गाणं हिट झालं आणि आनंद-मिलिंद स्टार झाले. त्यांच्या जत्रा सिनेमातील ‘कोंबडी पळाली… तंगडी धरून…’ या गाण्याचा किस्साही तसाच आहे. अभिनेता जितेंद्र जोशींनी हे गाणं लिहिलं आहे. जत्रा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरही हे गाणं गाजलं नाही. आश्चर्य म्हणजे सिनेमा प्रदर्शित होऊन दोन वर्ष उलटल्यानंतर हे गाणं गाजलं, असं आनंद सांगतात. (how anand shinde sold wife’s ornaments for cassette?, read story)

संबंधित बातम्या:

आजी-आजोबा गाणं गात भिक्षा मागायचे, पहिल्याच स्टेज परफॉर्मन्सवेळी ड्रेस नव्हता; वाचा, आनंद शिंदेंची फिनिक्स भरारी!

बाप महाराष्ट्राचा स्वर सम्राट, मुलगा सेंच्युरी मिलमध्ये; अशी झाली मिलिंद शिंदेंची जडणघडण

आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?

दहा हजारांच्या नोटांवर झोपवून बारसं, पत्नीसाठी जोडवेही सोन्याचे; आनंद शिंदेंचे हे किस्से माहीत आहेत काय?

‘पोपटा’चं गाणं सर्वात आधी कुणी गायलं?; आनंद शिंदेंकडे ते कसं आलं?; वाचा आनंद शिंदेंना स्टार बनविणाऱ्या गाण्याचा किस्सा!

(how anand shinde sold wife’s ornaments for cassette?, read story)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.