
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान हा त्याच्या हटके आणि रोमँटीक अंदाजानेच नाही तर त्याच्या विचारांनी, त्याच्या वागण्यातून देखील चाहत्यांना त्याच्या प्रेमात पाडतो. शाहरूख खान ज्या मेहनतीने पुढे आला आहे त्याचे अनेक किस्से, अनुभव तो त्याच्या मुलाखतींमध्ये सांगताना दिसतो. त्यामुळे अनेकांना त्यातून प्रेरणा मिळत असते.
एका गोष्टीची खंत
शाहरूख खानने त्याच्या याच मेहनतीने त्याचे स्वप्न पूर्ण केलं आहे. शाहरुख खान हा भारतातील सर्वात लोकप्रिय स्टारपैकी एक आहे आणि अलीकडेच तो जगातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी बनला आहे. शाहरुखने अफाट प्रसिद्धी आणि संपत्ती कमावली आहे. पण तरी देखील त्याला एका गोष्टीची खंत आजही आहे. तो याबद्दल नेहमी बोलताना, दु:ख व्यक्त करताना दिसतो.
शाहरूख कोणाला भेटण्यासाठी एवढा आतुर आहे?
शाहरूखला भेटण्यासाठी सर्व चाहते आतुर असतात. पण शाहरूखला देखील एका खास व्यक्तींना भेटण्याची प्रचंड इच्छा आहे. पण ती पूर्ण होऊ शकत नाही ही त्याची खंत आहे. त्या खास व्यक्ती म्हणजे त्याचे आई-वडील. शाहरूख आता ज्या प्रसिद्धीझोतात आहे, त्याचं यश, त्याचं सुपरस्टार होणं, हे सर्व त्याचे पालक पाहू शकले नाही याबद्दल कायम त्याला वाईट वाटतं. त्यासाठी त्याला आता आहे त्या यशासोबत त्यांना भेटण्याची इच्छा आहे.
शाहरुख खानने १९९२ मध्ये आलेल्या “दीवाना” चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याआधीच म्हणजे १९९१ मध्ये त्याची आई लतीफ फातिमा खान यांचे निधन झाले. त्याचे वडील ताज मोहम्मद खान यांचेही दहा वर्षांपूर्वी म्हणजे 1981 मध्ये निधन झाले. त्यामुळे त्यांना शाहरूखचं हे यश पाहता आलं नाही.
‘मी त्यांना कधीतरी नक्कीच भेटेन…’
2024 मध्ये दुबई येथे झालेल्या ग्लोबल समिटमध्ये शाहरुख खाननेही भाग घेतला होता. त्यावेळी अभिनेत्याला त्याच्या पालकांची आठवण आली आणि तो म्हणाला की ते जिथे असतील तिथे ते त्याला पाहत असतील. शाहरूखने म्हटलं, “माझे पालक ताऱ्यांसारखे चमकत आहेत, ते मला पाहत आहेत. त्यांना मला पुन्हा भेटण्याची इच्छा आहे आणि कधीनाकधी मी त्यांना नक्कीच भेटेन.”
“मी 24 व्या वर्षी अनाथ झालो.”
1965 मध्ये दिल्लीत जन्मलेल्या शाहरुख खानने त्याचे दोन्ही पालक गमावले. याबाबत तो पुढे म्हणाला, “मला कधीकधी प्रश्न पडतो की त्यांना माझी काळजी असेल का. पण मला त्यांना माझी खूप काळजी असावी कि माझं कसं होईल, पण त्यांनी माझी काळजी करू नये असं आता मला वाटतं. जेव्हा मी 24 व्या वर्षी अनाथ झालो तेव्हा बहुतेक त्यांनी हीच चिंता सतावत असणार की याचं कसं होईल? हा एकटा सगळं कसं करणार? म्हणून मी खूप मेहनत केली.” असं म्हणत त्यांने त्याच्या मनातील त्याच्या आई-वडिलांबद्दलचे प्रेम आणि त्यांना पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शाहरुख ‘या’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, शाहरुख खान सध्या पोलंडमध्ये त्याच्या आगामी “किंग” चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना आतुरतेने वाट पाहावी लागत आहे. “किंग” हा चित्रपट 2026 मध्ये मोठ्या पडद्यावर येण्याची अपेक्षा आहे.