भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानची मोठी अॅक्शन; चाहत्यांनाही वाटेल कौतुक

शाहरुख खान लवकरच त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. पण सध्या भारत-पाकिस्तानचा तणाव पाहता शाहरुख खान एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्याच्या या निर्णयाने मात्र त्याच्या चाहत्यांना त्याला पडद्यावर पाहण्यासाठी वाट पाहावी लागू शकते.

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानची मोठी अॅक्शन; चाहत्यांनाही वाटेल कौतुक
sharukh khan king
Image Credit source: Instagram
| Updated on: May 12, 2025 | 4:28 PM

‘ऑपरेशन सिंदूर’ आणि सध्याच्या भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सामान्यांप्रमाणे अनेक कलाकारही व्यक्त होताना दिसत आहेत. त्यात अनेकांनी आपले चित्रपट पुढे ढकलले आहेत तर कोणी सैन्याला आपल्या कमाईचा अर्धा हिस्सा समर्प्रित केला आहे. त्यातच आता अभिनेता शाहरूख खाननेही मोठा निर्णय घेतला आहे. त्याने भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानची मोठी अॅक्शन घेतली आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता महत्त्वाचा निर्णय

शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा ‘किंग’ पुढच्या वर्षी येणार आहे. या चित्रपटाचे शुटींग 16 मे पासून मुंबईत सुरू होणार आहे. एकीकडे चाहते शाहरुख खानच्या पुनरागमनासाठी उत्सुक आहेत, तर दुसरीकडे, सुहाना खान या चित्राद्वारे चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एक मोठी एन्ट्री घेताना दिसणार आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता, शाहरुख खान आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अनेक प्रॉडक्शन हाऊसेसने काय घेतले निर्णय

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अनेक प्रॉडक्शन हाऊसेसनी त्यांचे प्रकल्प पुढे ढकलले आहेत. त्याच वेळी, निर्मात्यांनी राजकुमार रावचा चित्रपट थिएटरमधून काढून टाकण्याची आणि तो ओटीटीवर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. याआधीही पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने आपला युके दौरा रद्द केला होता. अलिकडेच आमिर खानने ‘सीतारे जमीन पर’चा ट्रेलर रिलीजही पुढे ढकलला आहे. आता शाहरुखही मोठा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.

नक्की शाहरूखची मोठी अॅक्शन काय असेल…

अलिकडेच एका रिपोर्टनुसार. युद्धविरामनंतरही परिस्थिती अजूनही संवेदनशील असल्याचं सांगण्यात आलं. अशा परिस्थितीत, सर्व स्टार्स विचार करत आहेत की चित्रपटावर काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ असेल का? किंगचे काम 16 मे रोजी सुरू होण्याची अपेक्षा आहे. आता, या रिपोर्टनुसार असं म्हटलं जात आहे की जर चित्रपटाच्या कामात विलंब झाला तर ती मोठी गोष्ट नसावी. असे म्हटले जात आहे की सध्या परिस्थिती शांत झाल्यानंतरच शूटिंग सुरू केलं जाार असल्याचं म्हटलं जात आहे. पण किंगचे निर्माते आणि स्वतः शाहरुख यांनी याबद्दलची कोणती घोषणा केलेली नाही.


शाहरुखच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत चाहचे 

शाहरुख खानच्या या पुढच्या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अभिषेक बच्चनही आहे जो खलनायकाची भूमिका साकारत आहे. दीपिका पदुकोण आणि अर्शद वारसी यांच्याही एन्ट्रीच्या बातम्या आहेत. तथापि, सिद्धार्थ आनंदने खूप कन्फ्यूजन निर्माण केलं आहे. X वरील कोणत्या रिपोर्टला ते चुकीचे म्हणत आहेत, आणि कोणता रिपोर्टला बरोबर हे समजणे सध्या कठीण झाले आहे.

शाहरुख खानच्या टीमकडून लवकरच माहिती येऊ शकते

शाहरुख खानच्या टीमकडून अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येईल असं म्हटलं जात आहे. अनेक चित्रपट निर्मात्यांना वाटते की सध्या चित्रपट प्रदर्शित करणे हा योग्य निर्णय नाही. याचा परिणाम उत्पन्नावर होऊ शकतो. त्यामुळे शाहरूखनेही असाच निर्णय घेतला तर चित्रपटाची शुटींग उशीरा सुरु होऊ शकतं आणि जर तस झालं तर चित्रपट रिलीजलाही उशीर होऊ शकतो असं म्हटलं जातं.