Shalmali Kholgade : तुमच्यात शारीरिक संबंध कसे आहेत? आंतरधर्मीय लग्नापूर्वी मराठमोळ्या गायिकेला आईनं विचारलेला प्रश्न, सांगितला किस्सा

Singer On Her Marriage : मराठमोळ्या गायिकेनं एका मुलाखतीत आईनं लग्नापूर्वी विचारलेल्या प्रश्नाबद्दल सांगितलं आहे.

Shalmali Kholgade : तुमच्यात शारीरिक संबंध कसे आहेत? आंतरधर्मीय लग्नापूर्वी मराठमोळ्या गायिकेला आईनं विचारलेला प्रश्न, सांगितला किस्सा
| Updated on: Nov 26, 2026 | 6:44 PM

मराठी आणि बॉलिवूड संगीतविश्वात आपल्या वेगळ्या आवाजाने ओळख निर्माण करणारी गायिका शाल्मली खोलगडे कायम चर्चेत असते. ‘बलम पिचकारी’, ‘दारू देसी’, ‘परेशान’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांना तिनं आपला आवाज दिला आहे. आपल्या गाण्यांमुळे लोकप्रिय असलेली शाल्मली तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. शाल्मलीनं फरहान शेखसोबत आंतरधर्मीय विवाह केला आहे. त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबीयांकडून कोणताही विरोध झाला नव्हता. मात्र, लग्नाला होकार देण्यापूर्वी शाल्मलीच्या आईनं फरहानला एक प्रश्न विचारला होता.

शाल्मली खोलगडे आणि तिचा पती फरहान शेख यांनी ‘हॉटरफ्लाय’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत दोघांनी त्यांच्या लव्हस्टोरीपासून ते लग्नापर्यंतचे अनेक किस्से सांगितले. शाल्मली हिंदू कुटुंबातील आहे, तर फरहान मुस्लिम आहे. त्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल त्यांनी खुलासा केला.

Loading...

फरहान म्हणाला की, ‘माझी आणि तिची फॅमिली दोघेही धर्माबाबत फार सुशिक्षित आहे. दोघांपैकी कोणाच्याच कुटुंबीयांनी या लग्नासाठी विरोध केला नाही की, बाबा हे तुम्ही कसं काय करू शकता. कमीत कमी कन्व्हर्ट तरी करून घे, असं काही घडलं नाही.’

 

 

शाल्मलीच्या आईनं विचारलेला प्रश्न

पुढे शाल्मली म्हणाली की, ‘कदाचित मी आता जे बोलेन ते बोल्ड स्टेटमेंट असेल. पण, माझ्या लग्नापूर्वी जेव्हा मी माझ्या आईला आमच्या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं, आम्ही लग्न करणार आहोत असं सांगितलं. तेव्हा तिनं मला दोनच प्रश्न विचारले ते म्हणजे तुम्ही मुलांबद्दल एकमेकांशी बोलला आहात का? तर मी तिला म्हटलं, हो. आमच्यामध्ये याबाबत बोलणं झालं आहे. तिचा दुसरा प्रश्न होता की, तुमच्यात सेक्स कसं आहे? त्या प्रश्नाला मी चकित झाले. पण, तिला सांगितलं की सर्व चांगलं आहे. तेव्हा मग ती बोलली ठीक आहे. माझ्या मते जर तुमच्याकडे त्या दोन प्रश्नांची उत्तरं नाही आहेत, मग त्या मागची कोणतीही कारण असू द्या, तर मग तुम्हाला तुमच्या नात्याचा विचार करावा लागेल.

दरम्यान, शाल्मली खोलगडे आणि फरहान शेख यांनी 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांचा विवाहसोहळा अतिशय साध्या पद्धतीनं पार पडला होता. या लग्नाला दोन्ही कुटुंबांतील मिळून अवघे 15 जण उपस्थित होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us