AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

27.11.26… फोटोनंतर 10 सेकंदाचं रील, मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीचा उत्साह शिगेला, मोठी हिंट

मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कॅप्टनशीपबाबत चर्चांना उधाण आलं आहे. हार्दिक पांड्यानंतर आता रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार होणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मुंबईने शेअर केलेल्या व्हिडिओतील 27.11.26 ही तारीख आणि रहस्यमय दृश्यांमुळे नेमकं काय जाहीर होणार, याचा सस्पेन्स वाढला आहे.

27.11.26... फोटोनंतर 10 सेकंदाचं रील, मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीचा उत्साह शिगेला, मोठी हिंट
Mumbai Indian Captancy suspenceImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 6:32 PM
Share

सध्या क्रिकेटप्रमींना आयपीएलच्या नव्या हंगामाचे वेध लागले आहेत. क्रिकेटच्या खासकरुन भारतातल्या क्रिकेट चाहत्यांना दरवर्षी क्रिकेट टुर्नामेंट आयपीएलची प्रतिक्षा असते. यंदाच्या हंगामाचीही चाहते तशीच वाट पाहत आहेत. यंदा इंडियन प्रीमियर लीगचा तब्बल विसावा हंगाम आहे. या हंगामाच्या पार्श्वभूमिवर नुकताच रिटेन्शन सोहळा पार पडला. यावेळी स्पर्धेतील सर्व 10 संघांनी आपापले रिटेन आणि रिलिज खेळाडू यांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता आयपीएल 2027 च्या लिलावाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. परंतू त्यापूर्वीच आता सर्वात मोठ्या एका टीममध्ये मोठं काहीतरी घडत असल्याची कुणकुण लागली आहे. होय, मुंबई इंडियन्सने संघाचा मागिल कर्णधार हार्दिक पांड्याला रिलिज केलं आहे. हार्दिकनंतर मुंबई टीमचा कर्णधारपदी कोण बसणार, याची चर्चा जोर धरु लागलेली. याच चर्चांदरम्यान आणि लिलावाच्याआधीच रोहित शर्मा पुन्हा कर्णधार म्हणून समोर येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

या चर्चांना कारणीभूत ठरत आहे, मुंबईने सोशल मीडियावर शेअर केलेले काही व्हिडिओ आणि फोटो. मुंबई इंडियन्सने काहीचवेळापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक तारीख दिसत आहे. ही तारीख 27.11.26 अशी आहे. तसेच व्हिडिओमध्ये मुंबईचं हेल्मेट दिसत असून धूळ उडताना दिसत आहे. एक कबुतरही खिडकीत बसलेलं आहे. तर सावल्यांचा खेळही या 10 सेकंदांच्या व्हिडिओत दिसतो आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी मुंबईच्या चाहत्यांनी मात्र रोहित शर्माचं नाव घेतलं आहे. आम्हाला मुंबईच्या राजाची प्रतिक्षा आहे, तोच उद्या येत आहे, असं चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, कालही मुंबईने एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये हातात मुंबईची कॅप पकडलेला तो फोटो होता. या फोटोनंतरही चाहत्यांनी रोहित शर्माचंच नाव घतलं होतं. त्यामुळे आता रोहित शर्मा की आणखी कोण, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी उद्या याचा सस्पेन्स संपणार आहे. हे सर्व कॅप्टनच्या नावाची घोषणा करणारे व्हिडिओ आणि फोटो आहेत, हे मात्र चाहत्यांनी नेमकेपणानं ओळखलं आहे. त्यामुळे उद्या नेमका कोणता चेहरा समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?