AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकीकडं बैठका दुसरीकडे एनडीएत सामील होण्याची चर्चा, पवार गटात काय घडतंय? शशिकांत शिंदेंनी सगळं सांगितलं!

आम्ही द्विधा मनस्थितीत नाहीत. कोणत्याही कार्यकर्त्याच्या मनात कोणतीही शंका नाही. पक्ष संघटनेच्या बाबतीत पुढे काय? यावर कोणतीही चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण शशिकांत शिंदे यांनी दिलं.

एकीकडं बैठका दुसरीकडे एनडीएत सामील होण्याची चर्चा, पवार गटात काय घडतंय? शशिकांत शिंदेंनी सगळं सांगितलं!
rohit pawar ncp Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 6:40 PM
Share

NCP NDA support : सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. खासदार शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. परंतु शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा भेटसत्र सुरू झाले आहे. पवारांचा पक्ष एनडीएत सहभागी होऊ शकतं, असं बोललं जातंय. असं असतानाच या भेटी-गाठी वाढल्या आहेत. यावर आता पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय. तसेच त्यांनी रोहित पवार यांच्या मोर्चाविषयी पक्षाची भूमिका काय असेल, याबाबतही सांगितलं आहे.

कोणत्याही कार्यकर्त्याच्या मनात कोणतीही शंका नाही

शरद पवार यांचा पक्ष लवकरच एनडीएला पाठिंबा देऊ शकतो, असा दावा केला जातोय. या चर्चांमुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. त्यामुळे याबाबत पक्षात काही चर्चा होत आहे का? असा सवाल केला जातोय. यावर बोलताना “आम्ही द्विधा मनस्थितीत नाहीत. कोणत्याही कार्यकर्त्याच्या मनात कोणतीही शंका नाही. पक्ष संघटनेच्या बाबतीत पुढे काय? यावर कोणतीही चर्चा झाली नाही,” असं स्पष्टीकरण शशिकांत शिंदे यांनी दिलं. तसेच, पक्ष मजबूत करण्यासाठी काही जिल्ह्यातील काही प्रश्न होते. यावर चर्चा झाली. येणाऱ्या काळात या जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणी केली जाईल, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.

रोहित पवारांचा मोर्चा पक्षाच्या विरोधात आहे

यावेळच्या हिवाळी अधिवेशनात रोहित पवार विधींडळावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला पवारांच्या पक्षाचा पाठिंबा नाही, असं बोललं जातंय. यावर शिंदे यांनी महत्त्वाचं विधान केलंय. रोहित पवारांचा मोर्चा पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे त्या मोर्चाला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं थेट शिंदे यांनी सांगून टाकलंय. त्यामुळे आता रोहित पवार आणि पवार गट यांच्यातील मतभेद समोर आले आहेत, असं बोललं जातंय. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?