नागपूरमध्ये सीजेपीची रॅली सुरू असतानाच अभिजीत दिपकेला मोठा धक्का, सरकारची थेट मोठी कारवाई, आता.., अडचणी वाढल्या
आज नागपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीकडून मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टीच्या तीनही प्रमुख नेत्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

आज नागपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीकडून मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके, ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज आणि आशुतोष रांका सहभागी झाले आहेत. मात्र एकीकडे ही रॅली सुरू असतानाच आता दुसरीकडे मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे. कॉकरोच जनता पार्टीमधील सदस्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सौरभ दास यांच्यासोबतच अभिजीत दिपके आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. याचाच अर्थ आता सीजेपीच्या या तीनही मोठ्या नेत्यांना देश सोडता येणार नाहीये. इंडिया टुडेच्या एका रिपोर्टानुसार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात दोन ऑक्टोबरला आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाला कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ही लुकआउटची नोटीस जारी करण्यात आली आहे. हा अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
