मुस्लिमसोबत लग्न केल्यामुळे ट्रोल, स्पष्टच बोलली मराठी गायिका; म्हणाली, मी हिंदू धर्माचं पालन करत नाही…
Marathi Singer : मराठी गायिका शाल्मली खोलगडेनं मुस्लिम इंजिनीअरसोबत लग्न केलं असून त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर अभिनेत्रीनं भाष्य केलं आहे.

पार्श्वगायिका शाल्मली खोलगडे गायनात अतुलनीय आहेत. त्यांनी 'परेशन', 'बलम पिचकारी' आणि 'शनिवार राती' यांसारखी गाजलेली गाणी गायली आहेत. या गायिकेचे वैयक्तिक आयुष्य वादांनी घेरलं आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये, त्यांनी फरहान शेखसोबत आंतरधर्मीय विवाह केला.
फरहान एक इंजिनिअर आहे. त्यांच्या लग्नामुळे त्यांच्यावर टीका झाली. 'अनमिक्स्ड'सोबतच्या एका पॉडकास्टमध्ये शालमली म्हणाल्या की, फरहानसोबतच्या आंतरधर्मीय लग्नामुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं.
शाल्मली म्हणाली की, 'मी गेल्या पाच वर्षांपासून लोकांच्या प्रतिक्रिया ऐकत आहे. जेव्हा माझं लग्न झाले, तेव्हा मी 'लव्ह जिहाद'बद्दल खूप काही ऐकलं. तो माझ्यासाठी एक कठीण काळ होता. त्याचा माझ्यावर आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला. पण आता या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.'
'कारण ट्रोल करणारे लोक नेहमीच असतील. काही गोष्टी बोलता येत नाहीत, त्यांचे काहीतरी हेतू असतात. मी भीतीत जगत नाही. मी भाग्यवान आहे कारण मला भीतीत जगावं लागलं नाही. माझा धर्म हिंदू आहे. मी जन्मानं हिंदू आहे. मात्र, मी हिंदू धर्माचं फारसं पालन करत नाही. आमच्या घरी आम्ही कधीही गणपतीची मूर्ती ठेवली नाही.'
'माझ्या वडिलांच्या घरात एक जागा आहे. जिथे सर्व देवांच्या मूर्ती ठेवल्या आहेत. दर, गुरुवारी ते सर्व मूर्ती धुऊन त्यांची पूजा करतात. शाल्मली म्हणाली की, तिला कुठेही उभं राहून, डोळे मिटून देवाच्या नावाचा जप करायला शिकवलं होतं. 'माझा विश्वास आहे की, तुम्ही जिथे असाल तिथेच देव असतो.' असं शाल्मली पुढे म्हणाली.