AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘किल्ला’च्या दिग्दर्शकाने गुपचूप उरकलं दुसरं लग्न; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे पूर्व पत्नी

दरम्यान, व्यावसायिक आयुष्यात सातत्याने वेगवेगळे विषय हाताळणाऱ्या अविनाश अरुण यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या नव्या सुरुवातीमुळे चाहत्यांना आनंद झाला आहे. रितुजा आणि अविनाश यांच्या नव्या प्रवासासाठी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत.

'किल्ला'च्या दिग्दर्शकाने गुपचूप उरकलं दुसरं लग्न; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे पूर्व पत्नी
अविनाश अरुण, रितुजा आणि कादंबरी कदमImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 12, 2026 | 3:35 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अविनाश अरुण सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. ‘किल्ला’, ‘थ्री ऑफ अस’ यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या दिग्दर्शनाचा वेगळा ठसा उमटवणारे अविनाश अरुण यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी रितुजा यांच्यासोबत विवाह केला असून लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमुळे त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. सध्या मनोरंजनविश्वात त्यांच्या नव्या आयुष्याची आणि लग्नाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अविनाश यांचं पहिलं लग्न मराठी अभिनेत्री कादंबरी कदमसोबत झालं होतं.

रितुजासोबत बांधली लग्नगाठ

अविनाश अरुण यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नव्या आयुष्याची सुरुवात केल्याची आनंदाची बातमी दिली. या फोटोंमध्ये ते आणि रितुजा विवाहसोहळ्यातील खास क्षण अनुभवताना दिसत आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी आणि मनोरंजनविश्वातील अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अविनाश यांनी यावेळी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील हा महत्त्वाचा निर्णय सार्वजनिक करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला आहे.

पहा फोटो-

कोण आहेत अविनाश अरुण?

अविनाश अरुण हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ‘किल्ला’ या पहिल्याच दिग्दर्शकीय चित्रपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक मिळवलं होतं. या चित्रपटाला बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्रिस्टल बेअर पुरस्कार मिळाला होता. तसंच 62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मानही मिळाला होता. यानंतर त्यांनी ‘थ्री ऑफ अस’ या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटात शेफाली शाह, जयदीप अहलावत आणि स्वानंद किरकिरे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचं कथानक, छायाचित्रण आणि संवेदनशील मांडणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

‘प्रहार’ चित्रपटामुळेही चर्चेत

अविनाश अरुण सध्या ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आहेत. राजकुमार राव या चित्रपटात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात वामिका गब्बी, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Follow Us
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक