AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी खर्चात शिमला आणि मनाली फिरायला जायचं? पाहा IRCTC चं स्पेशल विंटर टूर पँकेज!

जर तुम्हाला तुमच्या हिवाळ्यात सुंदर बर्फाने भरलेले पर्वत आणि सुंदर दऱ्यांचा आनंद घ्यायचा असेल, तर हे टूर पॅकेज खास तुमच्यासाठीच तयार करण्यात आले आहे. याचे सविस्तर डिटेल्स जाणून घ्या.

कमी खर्चात शिमला आणि मनाली फिरायला जायचं? पाहा IRCTC चं स्पेशल विंटर टूर पँकेज!
| Updated on: Nov 12, 2026 | 3:12 PM
Share

नोव्हेंबरच्या शेवटी तुम्ही कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर ही बातमी एकदा वाचाच. कारण, तुम्हाला कमी पैशात मस्त शिमला-मनाली फिरायचा आनंद घेता येणार आहे. बर्फाने सजलेले डोंगर, निसर्गरम्य दऱ्या आणि थंडगार हवामानाचा आनंद या ट्रिपमध्ये तुम्हाला मिळणार आहे. भारतीय रेल्वेची पर्यटन शाखा असलेल्या IRCTC ने पर्यटकांसाठी शिमला-मनाली विंटर स्पेशल टूर पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून पर्यटकांना चंदीगड, शिमला आणि मनाली या लोकप्रिय पर्यटनस्थळांची सफर करता येणार आहे. विशेष म्हणजे, या ट्रिपची सुरुवात चेन्नईहून विमानप्रवासाने होणार आहे.

8 दिवस, 7 रात्रींची खास सफर!

IRCTC च्या या टूरचे नाव ‘SMA72 Shimla Manali Winter Special Ex. Chennai’ असे आहे. 26 नोव्हेंबर 2026 रोजी सुरू होणारी ही सहल 3 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे.

कालावधी: 7 रात्री आणि 8 दिवस

प्रस्थान: 26 नोव्हेंबर 2026

परतीचा दिवस: 3 डिसेंबर 2026

प्रवासाचे माध्यम: चेन्नई ते चंदीगड विमानप्रवास

उपलब्ध जागा: केवळ 21

या टूर पॅकेजमधील आणखी एक आकर्षण म्हणजे ऐतिहासिक कालका-शिमला टॉय ट्रेनचा प्रवास. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या या रेल्वेमार्गावरून प्रवास करताना डोंगर, बोगदे आणि निसर्गाचे अप्रतिम दृश्य अनुभवता येणार आहे.

काय काय बघायला मिळणार?

या टूरमध्ये पर्यटकांना तीन प्रमुख पर्यटनस्थळे जवळून अनुभवता येतील.

1. चंदीगड – निसर्ग आणि आधुनिकतेचा संगम

सहलीच्या पहिल्या आणि सातव्या दिवशी चंदीगडमधील प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली जाणार आहे. यामध्ये सुखना लेक, रॉक गार्डन, रोज गार्डन, एलांते मॉल, सेक्टर 17 प्लाझा, आर्ट म्युझियम आणि मनसा देवी मंदिर या ठिकाणांचा समावेश आहे.

2. शिमला – डोंगरांची राणी

शिमल्यात पर्यटकांना प्रसिद्ध मॉल रोडवर मनसोक्त भटकंती करता येईल. याशिवाय कालीबाडी मंदिर, जाखू मंदिर, संकट मोचन मंदिर, कुफरी, ग्रीन व्हॅली, फन वर्ल्ड आणि हिमालयन नेचर पार्क या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.

3. मनाली आणि कुल्लू – निसर्गसौंदर्याचा खजिना

मनालीच्या दिशेने जाताना सुंदरनगर लेक, पंडोह धरण, वैष्णो देवी मंदिर आणि कुल्लूमधील शाल कारखान्याला भेट देता येईल. मनालीमध्ये हिडिंबा देवी मंदिर, मनु मंदिर, वन विहार, क्लब हाऊस, बौद्ध मठ आणि तिबेटियन मार्केट या प्रसिद्ध ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय अटल टनेल आणि सोलंग व्हॅलीला भेट देण्याचीही संधी मिळू शकते. मात्र, या ठिकाणांचा समावेश स्थानिक प्रशासनाच्या परवानगीवर अवलंबून असेल.

टूर पॅकेजमध्ये कोणत्या सुविधा मिळणार?

प्रवासादरम्यान पर्यटकांना आरामदायी अनुभव मिळावा, यासाठी IRCTC कडून विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

चेन्नई ते चंदीगड आणि परतीच्या विमानप्रवासाचे तिकीट.

संपूर्ण सहलीदरम्यान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था.

शिमल्यात 2 रात्री, मनालीत 3 रात्री आणि चंदीगडमध्ये 2 रात्री मुक्काम.

पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी एसी टेम्पो ट्रॅव्हलरची सुविधा.

सहलीच्या 7 दिवसांसाठी नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था.

सर्व प्रवाशांसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स.

शिमला-मनाली टूरसाठी किती पैसे मोजावे लागणार?

या सहलीचे पॅकेज दर तुम्ही किती जणांसोबत प्रवास करत आहात आणि हॉटेलमध्ये किती जण एकत्र राहणार आहेत, यावर अवलंबून आहेत.

एकट्याने प्रवास (Single Occupancy) ₹73,500 प्रति व्यक्ती खर्च

दोन जणांसाठी (Double Occupancy) ₹54,800 प्रति व्यक्ती खर्च

तीन जणांसाठी (Triple Occupancy) ₹52,000 प्रति व्यक्ती खर्च

5 ते 11 वर्षे वयोगटातील मूल (बेडसह) ₹44,600 प्रति व्यक्ती खर्च

5 ते 11 वर्षे वयोगटातील मूल (बेडशिवाय) ₹39,600 प्रति व्यक्ती खर्च

बुकिंग करण्यापूर्वी लक्षात ठेवा!

बर्फाच्छादित पर्वतरांगा, ऐतिहासिक टॉय ट्रेनचा अनुभव आणि हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांची सफर एकाच पॅकेजमध्ये करण्याची ही चांगली संधी आहे. या टूरसाठी केवळ 21 जागा उपलब्ध असल्याने इच्छुक पर्यटकांनी बुकिंग आणि पॅकेजच्या अटींबाबत IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासावी.

Follow Us
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक